घरराजकारणमहाराष्ट्रातील 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे; सर्वच मंत्री आहेत कोट्यधीश

महाराष्ट्रातील 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे; सर्वच मंत्री आहेत कोट्यधीश

Subscribe

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने(ADR) सादर केला. अहवालात म्हटल्या प्रमाणे 20 पैकी 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत तर राज्यातील सर्वच मंत्री कोट्याधीश आहेत अशी माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसल्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्ह्णून तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन केलं. पण सरकार स्थापन होऊन सुद्धा राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार काही केल्या झाला नाही. तब्बल 40 दिवस झाल्यानंतर अखेर 9 ऑगस्ट रोजी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार झाला. शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 अश्या एकूण 18 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे आणि फडणवीस यांच्यासह एकूण 20 आमदारांचं हे मंत्रिमंडळ असेल.

दरम्यान 9 ऑगस्ट रोजी शपथ घेतलेल्या मंत्र्यांबाबतचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने(ADR) सादर केला. अहवालात म्हटल्या प्रमाणे 20 पैकी 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत तर राज्यातील सर्वच मंत्री कोट्याधीश आहेत अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष; मुंबईची जबाबदारी आशीष शेलार यांच्याकडे

एकूण 15 मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल

- Advertisement -

महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मंत्र्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केले आहे. या केल्या गेलेल्या विश्लेषणानुसार 15 मंत्र्यांनी स्वतःवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं तर 13 मंत्र्यांनी स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. या सर्वफच मंत्र्यांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरात आहे. या मालमत्तेचे सरासरी मूल्य 47. 45 कोटी रुपये एवढी आहे.

हे ही वाचा – शिंदे गटाकडून मुंबईसाठी रणनीती; दादरमध्ये मुख्यालय बांधणार, जागोजागी शाखा उभारणार

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने(ADR) सादर केलेल्या अहवालानुसार मलबार हिल मतदार संघाचे आमदार मंगल प्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. 441. 65 कोटी रुपये एवढी त्यांची संपत्ती आहे. तर पेठण मधील शिवसेनेचे आमदार संदीपान भामरे यांची संपत्ती सर्वात कमी आहे. 2. 92 कोटी रुपये एवढी संदीपान भुमरेंची संपत्ती आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला सदस्य नाही तर हे मंत्रिमंडळ पुरुष प्रधान आहे असा उल्लेख करता येतील. नेमका हाच मुद्दा हेरत विरोधकांनीसुद्धा शिंदे – फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. तर प्रतिज्ञापत्रात असलेल्या माहितीनुसार 8 मंत्री हे दहावी ते बारावी पर्यतच शिकसलेले आहेत तर 15 मंत्री हे पदवी किंवा त्या वरील शैक्षणिक पात्रता असलेले आहेत. त्याचबरोबर 4 मंत्र्यांचं सरासरी वय 41 ते 50 वर्षे आहे तर उर्वरित 16 मंत्र्यांचं सरासरी वय 51 ते 70 वर्षे आहे.

हे ही वाचा – राज्यातील महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवणार, भंडारा बलात्कारप्रकरणी सुषमा अंधारे संतप्त

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -