घरराजकारणगुजरात निवडणूकभूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; सलग दुसऱ्यांदा घेतली शपथ

भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान; सलग दुसऱ्यांदा घेतली शपथ

Subscribe

Bhupendra Patel | गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला.

गांधीनगर – भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. ते गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला.

गुजरात विधासनभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. १८२ पैकी १५६ जागांवर विजय मिळवल्याने भाजपाला ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेशची सत्ता गेल्यानंतरही गुजरातच्या विजयावर भाजपाला समाधान मिळाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये कमळ, हिमाचलमध्ये पंजा

आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी. नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री एच.बी.सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते.

- Advertisement -

कनूभाई मोहनलाल देसाई, ऋषिकेश पटेल, पटेल राघवजीभाई हंसजारभाई, बलवंतसिन्ह राजपूत, कुवांरजी बाबारीया, मुलुभाई बेरा, कुबेरभाई दिंडोर, धनुबेन बाबारीया, हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा, पुरुषोत्तम सोलंकी, खबर मगनभाई, मुकेशभाई पटेल, भिखुसिन्ह परमार, प्रफुल पानशेरिया, कुंवरजीभाई हलपटी या सर्वांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.


संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे सारे अंदाज मागे टाकत भाजपने विधानसभेच्या १८२ जागांपैकी रेकॉर्ड ब्रेक १५६जागा जिंकल्या. भाजपने ऐतिहासिक कामगिरी नोंदवलेली असताना काँग्रेसचा मात्र दारूण पराभव झाला आहे. गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसने १७९ जागांवर उमेदवार उभे केले होते, पण काँग्रेसला जेमतेम १७ ही दोन आकडी संख्या गाठता आली. आपच्या एण्ट्रीमुळे गुजरातमधील निवडणूक चुरशीची होईल असे अंदाज बांधले जात होते, मात्र हे सारे अंदाज फोल ठरले.


आपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर गुजरात आणि दिल्ली भाजप मुख्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर जनतेच्या आशीर्वादामुळेच हा विजय शक्य झाला, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -