घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Election 2022 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये वाढ, आपचे सर्वाधिक

Gujarat Election 2022 : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये वाढ, आपचे सर्वाधिक

Subscribe

अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला आहे. 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. दोन्ही टप्प्यांतील मिळून 1621 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 330 म्हणजेच सुमारे 20 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. 2017च्या तुलनेत अशा उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली असून त्यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे एकूण उमेदवार 238 होते. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक आम आदमी पार्टीचे उमेदवार आहेत.

या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सादर करून स्वत:ची तपशीलवार माहिती सादर केली आहे. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेने या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून याबाबतचा अहवाल तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 788 उमेदवारी अर्ज सादर झाले आहेत. त्यांनी दाखल झालेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 167 उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी निवडणूक होत असून 833 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 163 उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. 2017च्या गुजरात निवडणुकीमध्ये गु्न्ह्यांची नोंद असलेल्या एकूण संख्या 238 होती.

- Advertisement -

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वाधिक आपचे उमेदवार
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार बनेल, असे कागदावर लिहून देत भविष्यवाणी केली आहे. मात्र या निवडणुकीत त्यांचेच सर्वाधिक उमेदवार गु्न्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आपच्या 61 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर, काँग्रेसच्या 60 आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 32 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

गंभीर गुन्ह्यांतही आप अग्रस्थानी
एकूण 192 उमेदवारांवर खून, बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. यापैकी 96 उमेदवार भाजप, काँग्रेस आणि आपचे आहेत. त्यात आपचे 43 तर काँग्रेसचे 28 आणि भाजपचे 25 उमेदवार आहेत.

- Advertisement -

18 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत
एकूण 18 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असून एका उमेदवारावर बलात्काराचाही आरोप आहे. पाच उमेदवारांवर खुनाचे तर 20 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. दस्करोईतील आपचे उमेदवार किरण पटेल यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. पाटनचे काँग्रेस उमेदवार किरीट पटेल यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल आहे. भाजपाचे जेठाभाई घेलाभाई अहिर (भरवाड) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. जेठाभाई पंचमहाल जिल्ह्यातील शेहरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -