घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? हक्कभंग प्रकरणी मोठी अपडेट समोर

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? हक्कभंग प्रकरणी मोठी अपडेट समोर

Subscribe

ठाकरे गटाने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हणून संबोधले होते. त्यानंतर त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागण्यात आला. संजय राऊत यांनी दिलेला खुलासा विचारात घेऊन अभ्यासला आहे. त्यांनी हक्कभंग समितीवर आक्षेप घेणे चुकीचे आहे. मला त्यांचा खुलासा योग्य वाटत नाही, त्यामुळे ते राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांची हक्कभंगाची सूचना राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींकडे पाठवत आहेत, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी लोकसभेत दिली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळावरुन केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. यावरुन राऊतांकडून 9 मार्चला लेखी उत्तर अपेक्षित होते. मात्र, त्यांनी सविस्तर खुलाशासाठी 20 मार्चपर्यंत मुदतवाढ मागितली. त्यानंतर त्यांनी एक लेखी खुलासा सादर केला. हक्कभंग समितीविषयी विधीमंडळ प्रधान सचिवांना पत्र पाठवत राऊत यांनी हक्कभंग समितीवरच आक्षेप घेतला. हक्कभंग कारवाईबाबत गठीत केलेली समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरुपाची असणे अपेक्षित होते. पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांनाच जाणीपूर्वक स्थान दिल्याचे दिसते, असे संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हणत निलम गो-हे यांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उपराष्ट्रपतींकडे सोपवले आहे.

- Advertisement -

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

कोल्हापूर दौ-यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर चोर मंडळ असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेगट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. परंतु, यानंतर मात्र राऊत यांच्या विधानावर सत्ताधार-यांनी हक्कभंग आणण्याची मागणी केली. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यात आला. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. राऊत यांना केलेल्या वक्तव्यासंबंधी लेखी खुलासा देण्याची नोटीसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

( हेही वाचा: नॅक मूल्यांकन आवश्यक, अन्यथा महाविद्यालयांवर होणार ‘ही’ कारवाई; सरकारचा मोठा निर्णय )

- Advertisement -

राऊतांचा खुलासा काय

विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल, असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीही माझ्या विरोधात नेमके काय होते ते पाहा, असे राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊतांनी असे वक्तव्य केल्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत टीका केली होती. तसेच, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी देखील केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -