घरराजकारणLokSabha Election : भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अन्नामलाई यांच्यासह या नेत्यांचा...

LokSabha Election : भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अन्नामलाई यांच्यासह या नेत्यांचा समावेश

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सगळेच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. भाजपने (BJP) देखील उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारी जाहीर केली आहे. भाजपाने या उमेदवारी यादीतून तामिळनाडूमधील ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. यात तामिळनाडूमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून (BJP) पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जातोय. एखाद्या नेत्याची जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच भाजपकडून संबंधित नेत्याला तिकीट दिल जात आहे. भाजपने याआधी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत.

हेही वाचा – Congress : काँग्रेसचे महाराष्ट्रातील उमेदवार ठरले; शिंदे, धंगेकर रिंगणात, महानगरचे वृत्त ठरले खरे

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा असून, येथे डीएमकेच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि एआयएडीएमके यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. तर भाजपा आणि मित्रपक्ष या दोन्ही आघाड्यांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे.

निवडणूक रिंगणात कोण?

भाजपाने चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपाने तमिलसाई सुंदरराजन यांना उमेदवारी दिली आहे. तर चेन्नई मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाने विनोज पी. सेल्वम यांना उमेदवारी दिली आहे. वेल्लोर येथून ए. सी. षण्मुगम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने सी. नरसिम्हन यांना उमेदवारी दिली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या निलगिरी लोकसभा मतदारसंघामधून भाजपाकडून एल. मुरुगन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे तामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पेराम्बलूर लोकसभा मतदारसंघातून टी. आर. पलिवेंदर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. तूतुक्कूडी लोकसभा मतदारसंघामधून एन. नागेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. तर कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने माजी खासदार पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Ashish Shelar : राऊतांच्या डोक्यात सतत औरंगजेबाचेच विचार – आशिष शेलार

तामिळनाडूत सरशी होणार का?

दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला तामिळनाडूच्या राजकारणात अद्याप पाय रोवता आलेले नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि के. अन्नामलाई यांच्या नेतृत्वाखालील प्रचारसभांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे यावेळी येथे चांगली कामगिरी करण्याची भाजपाला अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -