घरराजकारणकेंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जी आक्रमक, 29 मार्चपासून करणार धरणे आंदोलन; काय आहे...

केंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जी आक्रमक, 29 मार्चपासून करणार धरणे आंदोलन; काय आहे कारण?

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातले मोदी सरकार यांच्यामध्ये सातत्याने आरोप- प्रत्यारोप होत असतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रावर अर्थसंकल्प रोखल्याचा केलेला आरोप ताजा असतानाच आता ममता बॅनर्जी यादेखील केंद्र सरकारविरोधात 29 मार्चपासून दोन दिवस धरणे आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दिल्लीतील नेते निवडणुकीच्या वेळी केवळ खोटं बोलतात, खोटी आश्वासने देतात, पण पैसे मात्र देत नाहीत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालला पैसे मिळाले नाहीत. केंद्र सरकार निधी जारी करत नसल्याचा आरोप करत, आता ममता बॅनर्जी 29 मार्चपासून दोन दिवस कोलकाता येथे धरणे आंदोलन करणार आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा : Live Assembly Budget 2023 : आयुक्तालय नव्हे फक्त आयुक्त दिल्लीत जाणार )

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, त्यांना त्यांच्या राज्याचे पैसे मिळाले नाहीत. केंद्र सरकार त्या पैशांचे अर्थकारण न करता केवळ राजकारण करत आहे. केंद्र सरकार कोणतेही सार्वजनिक कल्याणाचे काम करत नाही. बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेसाठी निधीदेखील जारी करत नाही.

सीएएच्या नावाखाली लोकांची दिशाभूल

बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील मोदी सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत आहे. मी आणि माझा पक्ष तृणमूल काॅंग्रेस मतुआ समुदायाची काळजी घेत आहोत. या समाजाचे मूळ बांगलादेशमध्ये आहे. सीएएच्या नावाखाली मोदी सरकार लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

भाजपाला राहुला गांधींना हिरो बनवायचंय

मागच्या दोन आठवड्यांपासून दिल्लीतही केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मात्र, राहुलन गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन आणि लंडनमध्ये भारतीय लोकशाहीविषयी केलेल्या वक्तव्यावरुन संसदेत सत्ताधा-यांनी राहुल गांधींना माफी मागण्यास सांगितले आहे. त्यावरुन गदारोळ सुरु असून, आतापर्यंत संसदेचे 100 तासदेखील काम झालेले नाही.

त्यामुळे संतप्त होत ममता बॅनर्जी यांनी परखड भूमिका मांडली आहे. जर राहुल गांधी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणीच ठामपणे उभे राहू शकणार नाही, असे ममता बॅनर्जी या बैठकीमध्ये म्हणाल्या.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -