घररायगडशेकापच्या चित्रलेखा पाटील स्वखर्चातून उभारणार कोविड सेंटर

शेकापच्या चित्रलेखा पाटील स्वखर्चातून उभारणार कोविड सेंटर

Subscribe

रायगड जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला असून, रुग्णांची उपचारासाठी सुविधा मिळविताना दमछाक होत असल्याची अडचण लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी स्वखर्चातून कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला असून, रुग्णांची उपचारासाठी सुविधा मिळविताना दमछाक होत असल्याची अडचण लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी स्वखर्चातून कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांनी अलिबाग तालुक्यातील कुरूळ ग्रामपंचायत हद्दीतील आरसीएफ वसाहतीमधील कोविड केअर सेंटरला भेट दिली. त्यावेळी तेथे केवळ दोनच महिला कर्मचारी कार्यरत होत्या. यावेळी प्रांत प्रशांत ढगे, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, गट विकास अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, अतिरिक्त गट विकास अधिकारी डॉ. कैलास चौलकर, शेकापक्ष आरोग्य सेलचे रुपेश पाटील, विक्रांत वार्डे उपस्थित होते.

सध्याच्या बिकट परिस्थितीत ऑक्सिजन बेडची आवश्यकता असल्याने शेकापक्षाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरुन रुग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत.
– चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख

- Advertisement -

पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 100 बेडच्या या सेंटरमध्ये 50 ऑक्सिजनचा पुरवठा करणारे बेड असतील. आरसीएफ स्कूलमध्ये हे सुसज्ज सेंटर उभारण्यात येणार असून, त्याची सोमवारी पहाणी करण्यात आली. प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीसाठी धावून जाणार्‍या पक्षाच्या शिलेदारांना आ. पाटील यांनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केलेे होते. प्रशासनानेही चित्रलेखा पाटील यांच्या दातृत्वाचे कौतुक केेले असून, सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा –

मुंबईतल्या कारागृहात कोरोनाचा विस्फोट ! इंद्राणी मुखर्जीसह ३८ महिला कैद्यांना कोरोना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -