घररायगडआगी लागतात पण विझवायला बंब नाही, अग्निशमन केंद्राची पोलादपूर जनतेची मागणी बासनातच

आगी लागतात पण विझवायला बंब नाही, अग्निशमन केंद्राची पोलादपूर जनतेची मागणी बासनातच

Subscribe

पोलादपूर शहरातही मागील काही वर्षांत भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात किंवा शहरात अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे शहर किंवा तालुक्याच्या कोणत्याही गावामध्ये आगीची घटना घडली तर प्रशासनाकडून महाड नगर परिषद, महाड औद्योगिक विकास क्षेत्र वसाहत आणि खेड नगर परिषद यांच्या आगीच्या बंबांची मदत घेतली जात आहे.

तालुक्याचे ठिकाण असलेले पोलादपूर शहर झपाट्याने विकसित होत असून या शहरात मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडल्याआहेत. पाच दिवसांपूर्वी २५ फेब्रुवारीला पोलादपूरपासून तीस किलोमीटरवर डोंगरमाथ्यावर वसलेल्या कामथेगावी मारूती चिकणे या ग्रामस्थाच्या घराला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले.यामध्ये अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. अशा आगी दरवर्षी घरांना लागत आहेत. या आगीची कारणे मात्र अद्याप पुढे आलेली नाहीत. तसेच गुरांच्या गोठयांना आगी लागल्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यात जनावरेही होरपळून मेली आहेत

पोलादपूर शहरातही मागील काही वर्षांत भीषण आगीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यात किंवा शहरात अग्निशमन केंद्र नाही. त्यामुळे शहर किंवा तालुक्याच्या कोणत्याही गावामध्ये आगीची घटना घडली तर प्रशासनाकडून महाड नगर परिषद, महाड औद्योगिक विकास क्षेत्र वसाहत आणि खेड नगर परिषद यांच्या आगीच्या बंबांची मदत घेतली जात आहे. मात्र, हे बंब ३० ते ३५ किलोमीटरहून येत असल्याने घटनास्थळी विलंबाने पोचत आहेत. त्यामुळे अग्निशमनच्या जवानांना जळून खाक झालेल्या राखेवर पाणी शिंपडण्याचे काम फक्त करावे लागते. गेली कित्येक वर्ष अग्निशमन दलाची मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आग सोमेश्वरी तर बंब रामेश्वरी अशी कुचकामी उपाय योजनेचा फार्मुला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत अवलंबला आहे . त्यामुळे शहरी भागात किंवा शहराच्या आजूबाजुच्या परिसरात शासनाने अग्नीशमन केंद्राची निर्मिती करावी अशी कळकळीची मागणी प्रामुख्याने ग्रामीण भागातून जोर धरत आहे.

- Advertisement -

येथील गावांतील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती चाकरमानी आहे. वर्षभरात सणासुदीला घरी आल्यावर समाधान वाटावे यासाठी किमान सोयीसुविधा असतील, असे घर चाकरमानी बांधत असतो.कोणी कवडी कवडी
गोळा करून तर काही कर्ज घेऊन घर बांधतात. अशा स्थितीत घराला आग लागली तर ते कुटंब अक्षरशः कोलमडते. मात्र घरमालकाला शासनाकडून नुकसान भरपाईची मिळणारी रक्कम इतकी नगण्य असते की शासन एक प्रकारे वेदनेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची भावना जनतेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -