घररायगडगाळ काढण्याबरोबरच अन्य उपाययोजनांचीही गरज, महाडमधील पूरपरिषदेत तज्ञांचा सल्ला

गाळ काढण्याबरोबरच अन्य उपाययोजनांचीही गरज, महाडमधील पूरपरिषदेत तज्ञांचा सल्ला

Subscribe

महाडसह अन्य काही तालुक्यात २०२१ मध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. पुराने यावेळी पाण्याची पातळी तब्बल २० फुटापर्यंत गेली आणि यावर्षी काही करून पूर नियंत्रणात आला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु झाले. याबाबत चर्चा करण्यासाठी महाडमध्ये उल्काताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

महाडमध्ये आलेल्या पुरावर नियंत्रण आणण्यासाठी केवळ गाळ काढणे हा उपाय नसून यावर अन्य उपाययोजना देखील राबवल्या पाहिजेत, असा सूर तज्ञांनी काढला आहे. तर कठोर भूमिका घेवून केलेल्या काही उपाययोजनामुळे भविष्यातील धोके टाळता येतील असेही सांगण्यात आले.

महाडसह अन्य काही तालुक्यात २०२१ मध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार माजवला. पुराने यावेळी पाण्याची पातळी तब्बल २० फुटापर्यंत गेली आणि यावर्षी काही करून पूर नियंत्रणात आला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु झाले. याबाबत चर्चा करण्यासाठी महाडमध्ये उल्काताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन, किशोरभाई धारिया, डॉ. प्रदीप पुरंदरे, डॉ. हिमांशू कुलकर्णी, गुरुदास नूलकर, डॉ.महेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. केवळ गाळ काढणे हा पूरनियंत्रण करण्यावर उपाय नसून गाळ काढण्यापेक्षा गाळाचे वहन होणे आवश्यक आहे. वातावरणातील बदल लक्षात घेता या सर्वांवर शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करून शासकीय यंत्रणेने थोडी कठोर भूमिका घेत केलेले उपाय भविष्यातील धोके टाळण्यास उपयोगी ठरतील असा सल्ला यातून देण्यात आला.

- Advertisement -

महाड शहराची भौगोलिक स्थिती पाहता शहरात सातत्याने पूर येणे स्वाभाविक आहे. मात्र त्यावर जर शास्त्रीयदृष्ट्या उपाय केले तर पूर टाळता येणे शक्य आहे, असे डॉ गुरुदास नूलकर यांनी सांगून शहराचा वाढता विस्तार आणि त्यातून निसर्गाजवळ केला जाणारा हस्तक्षेप नैसर्गिक बदलास कारणीभूत ठरत असल्याचे देखील सांगितले. पूररेषेत बांधकामे नकोत यावर केवळ चर्चा होते मात्र कारवाई होत नाही. शहरात वाढलेली बांधकामे आणि त्यातून पाणी मुरण्यास जागा शिल्लक राहिलेली नाही. नदी आणि परिसराशी मानवाचे नाते कसे आहे यावर नैसर्गिक बदल होत असतात. पूर येण्यास उगम स्थानातील बदल, शहरातील बदल, शहराभोवातालचा बदल, धरण क्षेत्रातील बदल, नदी पात्रातील बदल ही कारणे समोर आली आहेत असे सांगून डॉ. नूलकर यांनी पूररेषेतील बांधकामांवर फेरविचार आणि अनियोजित शहर विस्तारावर विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे डॉ. प्रदीप पुरंदरे यांनी देखील महापूर रोखण्यासाठी उपाययोजनांचा संच तयार करणे आवश्यक असल्याचे सांगून पूर रेषेतील दुर्लक्ष भविष्यासाठी घातक असल्याचे सांगितले. देशातच नव्हे तर अन्य बड्या राष्ट्रात देखील पूरपरिस्थिती निर्माण होते. मात्र, त्याठिकाणी केले जाणारे उपाय याठिकाणी करताना स्थानिक लोकांचा विश्वास आणि त्यांचा रोजगार याचा विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी रोजगाराची साधने आहेत अशा जागेतून स्थलांतर सहजासहजी शक्य नसल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी मांडून पुराच्या परिस्थतीचे राजकारण न करता पूर रोखण्यासाठी सामूहिकरीत्या प्रयत्न झाले पाहिजेत असेही मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

डॉ. हिमांशु कुलकर्णी यांनी म्हटले की, पृथ्वीतलावर उलथापालथ होत असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे यावर्षी मोठ्या प्रमाणात आलेल्या दरडी आणि भूस्खलन आहे. यासाठी पूर्व चेतावणी प्रणाली अवलंबली पाहिजे. तर आप्तकालीन व्यवस्थेवर बोलताना डॉ. महेश कांबळे यांनी धोक्याची बघण्याची वृत्ती तयार झाली पाहिजे आणि आपत्कालीन स्थितीला तोंड देण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे असे सांगितले. स्थानिक लोकांना बरोबर घेवून आपत्कालीन व्यवस्था आराखडा तयार होणे आवश्यक असल्याचे देखील कांबळे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -