घररायगडखोपोलीत सोनसाखळी चोरटा जेरबंद; शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

खोपोलीत सोनसाखळी चोरटा जेरबंद; शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

Subscribe

गेल्या आठवड्यात एकाच रात्रीच्या सुमारास घडलेल्या घडफोडीनंतर स्थानिक पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असतानाच सोमवारी रात्रीच्या वेळेत जेवणानंतर सोनम देशमुख ही महिला कारमेल स्कूल भानवज रस्त्यावर फेरफटका मारत असतानाच एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने एक सोन्याचा मुलामा दिलेले दागिने जबरदस्तीचे खेचून पळाला. पुढे तो काटरंग येथील एच.एम.सुपर मार्केटच्यासमोर चालणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच लक्ष्मीनगर परिसरात जिगरबाज पोलिस हवालदार प्रविण भालेराव यांनी पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या.

खोपोली: गेल्या आठवड्यात एकाच रात्रीच्या सुमारास घडलेल्या घडफोडीनंतर स्थानिक पोलिसांनी शहरात गस्त वाढवली असतानाच सोमवारी रात्रीच्या वेळेत जेवणानंतर सोनम देशमुख ही महिला कारमेल स्कूल भानवज रस्त्यावर फेरफटका मारत असतानाच एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने एक सोन्याचा मुलामा दिलेले दागिने जबरदस्तीचे खेचून पळाला. पुढे तो काटरंग येथील एच.एम.सुपर मार्केटच्यासमोर चालणार्‍या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच लक्ष्मीनगर परिसरात जिगरबाज पोलिस हवालदार प्रविण भालेराव यांनी पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. सतीश नामदेव कळंबेकर असे या आरोपीचे नाव असून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता येत्या शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
देशमुख या कारमेल स्कूल, भानवज गावच्या समोरील रस्त्यावरून नातेवाईकांसोबत चालत असताना आरोपी कळंबेकरने सोन्याचा मुलामा दिलेले दागिने मोटारसायकलवरून जबरदस्तीचे खेचून निघून गेला. यावेळी देशमुख आणि सोबतच्या साक्षीदार यांना त्याने ढकलून दिल्याने दुखापत झाली.त्याच आरोपीने मोटार सायकलवर पुढे जात मौजे काटरंग येथील एच. एम. सुपरमार्केटच्या समोर रस्त्यावर शतपावली करीत असणार्‍या गंगा यादव गौडा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र यादव गौडा यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घट्ट पकडून ठेवल्याने चोरटा तसाच पळाला. याबाबत दोन्ही महिलांच्या नातेवाईकांनी तातडीने खोपोली पोलीस
ठाणे येथे फोन करून घडलेल्या घटनेवाल माहिती कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी त्वरीत पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना रवाना करून शहरातील सर्व एक्झीट पॉईंटवर नाकाबंदी सुरू केली. नमूद पिडीत दोन्ही महिलांना पडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल करण्याकरिता पोलीस ठाण्यात येण्यास सुचविले. याच दरम्यान शहरातील लक्ष्मीनगर येथील शक्ती सोसायटीच्या समोरच्या रस्त्यावर एक संशाईत मोटार सायकलस्वार चेहर्‍याला मास्क घालून रात्रीच्या वेळी संशयास्पद असल्याची माहिती गौरव शिंदे यांच्याकडून मिळाली. तेवढ्यातच घटनास्थळी पोलिस हवालदार प्रविण भालेराव आणि इतर लक्ष्मीनगर येथील शक्ती सोसायटी समोर पोहोचले. संशयित मोटार सायकलस्वारास पोलिसांचा संशय आल्याने तो देखील तेथून त्याच्या मोटार सायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून संशयितास मोटार सायकलसह ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तक्रार देण्याकरिता हजर असणार्‍या दोन्ही तक्रारदार महिलांनी आरोपीस आणि त्याच्या कडील मोटार सायकल यांना ओळखून तोच इसम जबरी चोरी करून पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीसांनी नमूद इसमाची दोन पंचासमक्ष झडती घेतली.
कळंबेकर हा सराईत आरोपी गुळसुंदे परिसरातील असून खोपोलीतील सोमजाईवाडीत भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आहे.सोनम निकेत देशमुख यांच्या तक्रारीनुसार भा.द.वि.कलम ३९४ तर गंगा यादव गौडा यांच्या तक्रारी नुसार भा.द.वि.कलम ३९३ गुन्हा र.नं- -४३१ /२०२३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी न्यायालयात हजर केला आरोपीला १० फेब्रुवारी पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -