घररायगडLok Sabha Election 2024 : घरून मतदानासाठी 36 हजारांहून अधिक मतदार इच्छुक

Lok Sabha Election 2024 : घरून मतदानासाठी 36 हजारांहून अधिक मतदार इच्छुक

Subscribe

रायगड लोकसभा मतदारसंघ 36 हजार 945 दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म १२डीचे वाटप करण्यात आले असून 3 हजार 59 मतदारांनी याला प्रतिसादही दिला आहे

अलिबाग : लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत 85 वर्षांवरील ज्येष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींना घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात रायगड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत 36 हजार 945 अर्जांचे (फॉर्म १२ डी) वाटप झाले असून 3 हजार 59 अर्ज भरून देण्यात आले आहेत.

या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने शंभरी ओलांडलेल्या, 85 वर्षांपेक्षा अधिक तसेच दिव्यांग मतदारांना घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय दिला आहे. ज्यांना ही सुविधा हवी त्यांनी मतदानाची अधिसूचना जारी झाल्यापासून पाच दिवसांत निवडणूक आयोगाच्या जवळच्या कार्यालयातील बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे फॉर्म 12 डी भरून जमा करायचा आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : सी-व्हिजिल Appवरील तक्रारींचा फडशा

यासाठी निवडणूक आयोगाच्या http://www.eci.gov.in या वेबसाइटवरून हा फॉर्म डाउनलोड करण्याची सुविधा आहे. तसेच हा फॉर्म लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी जिल्हा अधिकारी कार्यालयातही उपलब्ध आहे. काही ठिकाणी बूथ लेव्हल अधिकारी मतदारांच्या घरी येऊन फॉर्म भरून घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : अजबच! ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास शिक्षाच नाही, सर्वोच्च न्यायालयालाही आश्चर्य

घरबसल्या केल्या जाणाऱ्या पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी पाच जणांचा समावेश आहे. यासाठी एका पथकाची स्थापना केली जाईल. प्रत्येक पथकात मतदान केंद्राध्यक्ष दर्जाचा अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, मदतनीस, पोलीस आणि चित्रीकरण करणारी व्यक्ती यांचा समावेश असणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी घरबसल्या मतदानाची तारीख ठरवतील.

पोस्टल बॅलेटवर संबंधिताने मत नोंदवल्यानंतर त्याची नियमानुसार घडी घालून ती पाकिटबंद केली जाईल. या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. मतदाराला एसएमएस किंवा पोस्टाने पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठीची तारीख आणि वेळ याबद्दल पूर्वसूचना दिली जाईल.

वाटप केलेले आणि भरलेले अर्ज

  • पेण विधानसभा मतदारसंघ – ६ हजार 196 (591)
  • अलिबाग विधानसभा मतदारसंघ – 8 हजार 736 (258)
  • श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ – 2 हजार 737 (552)
  • महाड विधानसभा मतदारसंघ – 9 हजार 414 (366)
  • दापोली विधानसभा मतदारसंघ – 4 हजार 699 (665)
  • गुहागर विधानसभा मतदारसंघ – 5 हजार 163 (627)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -