घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : सी-व्हिजिल Appवरील तक्रारींचा फडशा

Lok Sabha Election 2024 : सी-व्हिजिल Appवरील तक्रारींचा फडशा

Subscribe

रायगड जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या अनेक तक्रारी होत्या. एकूण २९ पैकी १६ तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. तर १३ तक्रारी खोट्या असल्याचे स्पष्ट झाले.

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राकडे तसेच सी-व्हिजिल अॅपवर प्राप्त २९ तक्रारीपैकी १६ तक्रारींवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. तर १३ तक्रारी खोट्या असल्याचे स्पष्ट झाले.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड या सात विधानसभा मतदारसंघातून आचारसंहिता भंग प्रकरणी आलेल्या तक्रारींतून सी-व्हिजिल पोर्टलवर आलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यात येत आहे. १६ मार्चपासून अलिबाग विधानसभा मतदारसंघातून एक, कर्जतमधून ९, पनवेलमधून १२, पेणमधून २, श्रीवर्धन २ आणि उरण मतदारसंघातून ३ तक्रारी आल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Accident : पाली-खोपोली महामार्गावर तीन अपघात

या तक्रारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली काढण्यात आल्या. त्यातील तीन तक्रारी दखल घेण्यायोग्य नसल्याने त्या अॅपमधून आपोआप गेल्या. त्यामुळे केवळ १६ तक्रारी दखल घेण्यायोग्य होत्या. त्यावर कारवाई करत त्या निकालात काढल्या. सी-व्हिजिल अॅपवर आलेल्या तक्रारींमध्ये भूमी पूजनफलक, बॅनर उघडे असल्याच्या तक्रारीचा समावेश होता. महाड विधानसभा मतदारसंघातून एकही तक्रार आलेली नाही, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

रायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन हे चार विधानसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण या तीन विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता संदर्भात प्रशासनाने विविध माध्यमातून कारवाई सुरू केली आहे. शस्त्र जप्ती, रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू याबाबतची तपासणी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विविध स्वरुपाच्या उपाययोजना केल्या जात असून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

खोट्या तक्रारी आणि कारवाई

  • अलिबाग –  खोटी तक्रार १
  • पेण – खोटी तक्रार १, निकाली तक्रार १
  • कर्जत – खोट्या तक्रारी ६, निकाली काढलेल्या तक्रारी ३
  • पनवेल – खोट्या तक्रारी ३, निकाली काढलेल्या तक्रारी ९
  • श्रीवर्धन – एकही खोटी तक्रार नाही, निकाली काढलेल्या तक्रारी २
  • उरण – खोट्या तक्रारी २, निकाली काढलेली तक्रार १
  • महाड – एकही तक्रार नाही
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -