घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : अजबच! ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास शिक्षाच नाही, सर्वोच्च...

Lok Sabha Election 2024 : अजबच! ईव्हीएममध्ये फेरफार झाल्यास शिक्षाच नाही, सर्वोच्च न्यायालयालाही आश्चर्य

Subscribe

देशाच्या राजकारणात ईव्हीएम घोटाळ्याप्रकरणी बरेच आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करवा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र यंदाही लोकसभा निवडणुकीचे मतदान ईव्हीएम मशीनद्वारे होणार आहे.

मुंबई : देशाच्या राजकारणात ईव्हीएम घोटाळ्याप्रकरणी बरेच आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर करवा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र यंदाही लोकसभा निवडणुकीचे मतदान ईव्हीएम मशीनद्वारे होणार आहे. पण या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आहेत. कारण ईव्हीएम मशीलमध्ये काही फेरफार झाल्यास शिक्षा नाही आहे. त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावले. (Lok Sabha Election 2024 no punishment for evm manipulation supreme court slams election commission)

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्व मतदान पावत्यांची मोजणी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर न्या. संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांना शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला. यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने सांगितले की, याबाबत असा विशिष्ट कायदा नाही. यावरून न्या. संजीव खन्ना आणि दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने आयोगाला सुनावले. त्यानुसार, “जोपर्यंत कठोर शिक्षेची भीती वाटत नाही तोपर्यंत ईव्हीएममधील फेरफार होण्याची शक्यता नेहमीच असते”, अशा शब्दांत आयोगाला सुनावले. शिवाय, ‘ मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपामुळे आणखी समस्या आणि पक्षपात होऊ शकतो’, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी 10 हजार 652 मतदान केंद्र

दरम्यान, “मानवी हस्तक्षेपाशिवाय मशीन अचूक परिणाम देते. मात्र ज्यावेळी मानवी हस्तक्षेप होतो वा मशीन किंवा सॉफ्टवेअरमध्ये अनधिकृतपणे बदल केले जाविशेष म्हणजे ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली नाही. याशिवाय, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत की नाही, याबाबतही खंडपीठाने निवडणूक आयोगाला सवाल विचारला. त्यावरही न्यायालयाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. साधारणपणे 50 टक्के मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असे आयोगाने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी 18 एप्रिल रोजी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार; आता छुप्या प्रचारावर उमेदवारांचा भर

Edited By Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -