घररायगडओला काजु गर बाजारात दाखल; खवय्यांची खरेदीसाठी लगबग

ओला काजु गर बाजारात दाखल; खवय्यांची खरेदीसाठी लगबग

Subscribe

ओले काजू गर म्हटले की सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. सध्या जिल्ह्यात अशाच ओल्या काजू गराचा हंगाम बहरला असून बाजारात मुबलक प्रमाणात आणि परिपक्व ओले काजूगर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खवय्यांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

पाली: ओले काजू गर म्हटले की सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. सध्या जिल्ह्यात अशाच ओल्या काजू गराचा हंगाम बहरला असून बाजारात मुबलक प्रमाणात आणि परिपक्व ओले काजूगर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खवय्यांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
गेल्यावर्षी चक्रीवदळात बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र तरी देखील यावर्षी उत्पादन चांगले मिळत आहे. काजुचे फळ तयार होण्यापूर्वी येणारी बी काढून त्यातील गर काढला जातो. त्याची भाजी करुन खाल्ली जाते. आदिवासी महिला हा रानचा मेवा मुबलक प्रमाणात विकायला घेवून येत आहेत.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून या झाडांवर काजुच्या बिया येवू लागल्या त्या बिया तोडून काजूगर आदिवासी महिला बाजारात विकण्यासाठी घेवून येत आहेत.सुधागड तालुक्यासह श्रीवर्धन, म्हसळे, माणगाव, महाड, अलिबाग यासह इतर तालुक्यात काजूगर शेकड्याने मिळतात. तर रोहे, सुधागड आदी तालुक्यात अर्धे काजूगर वाट्यावर मिळतात. तर २५०ते ३००रुपये शेकड्यांनी मिळत आहे. तर ७५ ते ८० रुपयांना ५ वाटे काजूगर मिळत आहेत. मे महिन्यापर्यंत ओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरु असतो. काजुच्या बिया विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसे देखिल मिळतात. पण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

चविष्ट काजुच्या बियांची घ्या मज्जा
चविष्ट काजुच्या बिया वेगवेगळ्या प्रकारे खाल्या जातात. काजुच्या बियांचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. काजुच्या बियांचा पुलाव व बिर्यांनी देखिल केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळीमध्ये टाकुन सुद्धा काजुच्या बिया खाल्ल्या जातात. अशा या चिविष्ट आणि स्वादिष्ट बिया जेवणाची लज्जत वाढवितात.

- Advertisement -

बिया काढण्यासाठी मेहनत आणि हातांची दुरवस्था
दुर्गम, डोंगराळ भागात आणि जंगलात काजुच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. आदिवासी बांधव अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. त्यामुळे त्यांचे हात चिकामुळे पुर्णपणे खराब होतात. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये आदिवासींना बिया काढून विकाव्या लागतात. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे आहे. असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पालकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -