घररायगडपेणनजीक रेल्वे रुळाला तडे; कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

पेणनजीक रेल्वे रुळाला तडे; कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला

Subscribe

पेण नजीक रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही होती, मात्र रेल्वे कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे पुढील संभाव्य दुर्घटना टळली. तर याचा परिणाम म्हणून सकाळच्या वेळेत या मार्गावरुन धावणार्‍या अन्य गाड्या थांबवण्यात आल्याने या मार्गावरील कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पेण : मितेश जाधव

पेणहून पनवेलला जाणार्‍या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या स्थानकांदरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी ६ वाजुन २२ मिनिटांच्या दरम्यान दिसून आला.

चार गाड्यांना थांबवल्या
याबाबतची माहिती रेल्वे कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना तातडीने कळवली. लगेचच रेल्वे अधिकार्‍यांनी तातडीने सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी दिवा स्थानकातुन सुटणारी रोहा – दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजिक थांबविले. यानंतर मडगाव – नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी ६.४५ ला सुटणारी पेण – दिवा मेमु रेल्वे आणि मंगलोर – मुंबई रेल्वे या चार गाड्यांना थांबवण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवरती सुरू करीत सकाळी ७.३० वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. १० ते ३० किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या.
——————

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -