घररायगडखालापूर नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे, रोशनी मोडवे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

खालापूर नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे, रोशनी मोडवे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

Subscribe

शेकापने निवडणूक निकालानंतर लगेचच आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. खासदार सुनिल तटकरे यांनी विजयी उमेदवारांना आपण घ्याल त्या निर्णयाचे पक्ष स्वागत करेल असे सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पारठे यांनी निवडणुकीपूर्वीच सेनेसोबत आघाडी केली होती.

खालापूर नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आणि सत्ता स्थापनेसाठी निर्माण झालेली त्रिशंकु अवस्था पाहता खालापुर नगरपंचायतीची सत्ता कोण हस्तगत करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. ४ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या रोशनी मोडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु इतर कुठल्याही पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने शिवसेनेच्या रोशनी मोडवे यांची खालापूर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

शेकापने निवडणूक निकालानंतर लगेचच आपण विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. खासदार सुनिल तटकरे यांनी विजयी उमेदवारांना आपण घ्याल त्या निर्णयाचे पक्ष स्वागत करेल असे सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पारठे यांनी निवडणुकीपूर्वीच सेनेसोबत आघाडी केली होती. शेकापने आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचे सांगितल्याने सेनेला सत्ता स्थापन करण्याची सुवर्ण संधी मिळाली. त्यामुळे कोणीही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले नाहीत.

- Advertisement -

खालापूर नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेकडे आल्याने शिवसैनिकांमध्ये जल्लोश पाहायला मिळाला. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, उपजिल्हाध्यक्ष भाई गायकर, नवीन दादा घाटवळ, कर्जत खालापूर संपर्क प्रमुख पंकज पाटील, तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंड, तालुका प्रमुख संतोष विचारे, समन्वयक एकनाथ पिंगळे, शहर प्रमुख सुनील पाटील, युवासेना तालुका प्रमुख महेश पाटील याचप्रमाणे सर्व नगरसेवक ,नगरसेविका, शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -