भारतीय संघासमोर आज ‘करो या मरो’ स्थिती, श्रीलंकेविरुद्ध अश्विन-कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता

आशिया चषक २०२२ च्या सुपर-4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानसोबत भारतीय संघाने सामना गमावल्यानंतर आज करो या मरो स्थिती संघासमोर निर्माण झाली आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला तिन्ही विभागात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहूल या दिग्गज खेळाडूंनी मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. तिघांकडून आजही भारतीय चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या हिरो ठरला होता. तर युझवेंद्र चहलदेखील आऊट ऑफ फॉर्म दिसत आहे. रविंद्र जडेजा स्पर्धेबाहेर पडल्याने संघ अडचणीत सापडला आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. तर श्रीलंकेविरुद्ध खेळण्यासाठी अश्विन-कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्रीलंकेचा संघ डावखुऱ्या फलंदाजांनी भरलेला आहे. त्यामुशे अशा स्थितीत फिरकीपटू आर.अश्विनचा संघात समावेश होऊ शकतो. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर आज एक मोठं आव्हान असणार आहे.

असा असतील दोन्ही उभय संघ –

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, आवेश खान, अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन.

श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तेक्षाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण जयविक, कारनानाना, फेर्नानाना, धनंजय डी सिल्वा. , अशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा आणि दिनेश चंडिमल


हेही वाचा : विराटला कोणाकडून मेसेज अपेक्षित होते? सुनील गावसकर यांचा सवाल