घरक्रीडा'नव्या युगाची सुरुवात...'; BCCIच्या मानधनाच्या निर्णयावर महिला खेळाडूंची प्रतिक्रिया

‘नव्या युगाची सुरुवात…’; BCCIच्या मानधनाच्या निर्णयावर महिला खेळाडूंची प्रतिक्रिया

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुरुवारी ट्विटरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणेच सामना शुल्क देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) करारबद्ध केलेल्या भारतीय महिला खेळाडूंना पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे समान मानधन देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर महिला खेळाडूंनी ट्विट करून त्यांचे आभार मानले आहेत. (BCCI Indian Women Cricket Team equal match fee pay for men and women cricketers)

कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्सला 15 रुपये दिले जातात. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी 6 लाख रुपये दिले जातात. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका सामन्यासाठी पुरुष क्रिकेटर्स 3 लाख रुपये मानधन दिले जातात, त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही तितकेच मानधन मिळणार आहे.

- Advertisement -

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुरुवारी ट्विटरवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या पुरुष समकक्षांप्रमाणेच सामना शुल्क देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानत त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारतातील महिला आणि पुरुषांसाठी मॅच फीमध्ये समानतेची घोषणा हे खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे.”

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेने हा निर्णय स्वीकारला आहे. याआधी बीसीसीआयने आणखी एक ऐतिहासिक घोषणा केली होती की, महिला आयपीएलचा पहिला हंगाम पुढील वर्षी खेळवला जाईल.

- Advertisement -

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने ट्विट केले की, भारतातील महिला क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे. पुढील वर्षी WIPL पे इक्विटी पॉलिसीसह, भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात होईल. हे घडवून आणल्याबद्दल जय शहा आणि बीसीसीआयचे आभार.”

सलामीवर स्मृती मानधनानेही ट्विट करून बीसीसीआयचे आभार मानले आहेत. स्टार गोलंदाज स्नेह राणानेही ट्विट केले आणि लिहिले की, जय शाह आणि बीसीसीआयचे आभार. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंइतकीच मॅच फी दिली जाणार आहे.


हेही वाचा – बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष- महिला क्रिकेटर्सला मिळणार समान मानधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -