घरक्रीडाIPL 2022: 'चेन्नई'चा अष्टपैलू मोईन अली दुखापतग्रस्त; आठवडाभर राहावे लागणार मैदानाबाहेर

IPL 2022: ‘चेन्नई’चा अष्टपैलू मोईन अली दुखापतग्रस्त; आठवडाभर राहावे लागणार मैदानाबाहेर

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलच्या 15 व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जला चांगली कामगिरी करता आली नाही. सुरूवातीपासून पराभावाची मालिका आणि केवळ 2 सामन्यात विजय मिळवल्याने चेन्नईसमोर आयपीएल विजयाचे संकट उभे राहिले आहे.

इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलच्या 15 व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जला चांगली कामगिरी करता आली नाही. सुरूवातीपासून पराभावाची मालिका आणि केवळ 2 सामन्यात विजय मिळवल्याने चेन्नईसमोर आयपीएल विजयाचे संकट उभे राहिले आहे. अशातच आता चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा अष्टपैलू मोईन अली याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला आठवडाभरासाठी मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. याबाबत चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिग यांनी माहिती दिली आहे.

“मोईनच्या पायाला दुखापत झाली आहे. पायाला फ्रॅक्चर नसला, तरी मोईनला तंदुरुस्त होण्यासाठी किमान सात दिवसांचा कालावधी लागेल. मात्र, तो लवकरच मैदानात परतेल अशी आम्हाला आशा आहे”, असे चेन्नईचे प्रशिक्षक फ्लेमिग यांनी सांगितले. गेल्या शनिवारी सरावादरम्यान मोईनच्या पायाला दुखापत झाली. त्याला सोमवारी पंजाबविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईला ११ धावांनी पराभव पत्करावा लागला.

- Advertisement -

यंदाच्या पर्वात चेन्नईच्या खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागत आहे. मोईन अलीआधी प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरला ही दुखापत झाली होती. चहरच्या आधी पाय आणि मग पाठीला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण हंगामातून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्नेलाही केवळ एक सामना खेळता आला. आता मोईनही दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नईची चिंता वाढली आहे.

महाराष्ट्राचा अष्टपैलू राजवर्धन हंगर्गेकरने युवा विश्वचषकात केलेल्या कामगिरीच्या आधारे चेन्नईने त्याला खेळाडू लिलावात खरेदी केले. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. “हंगर्गेकर खूपच प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र, त्याच्या खेळात सुधारणेला वाव आहे. त्याने संयम बाळगून खेळावर मेहनत घेत राहणे गरजेचे आहे”, असे प्रशिक्षक फ्लेमिग यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: सुरेश रैनाला फिल्डींग कोच बनवण्याची चाहत्यांची मागणी; कर्णधार जडेजा सोशल मीडियावर ट्रोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -