India vs Sri Lanka: सिलेक्टर्स डोकच वापरत नसल्याची दिलीप वेंगसरकरांची टीका, तरूण खेळाडूंना डच्चू दिल्याने चिडले

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिग्गज क्रिकेटपटू सर्फराज खान आणि ऋतुराज गायकवाडला बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजचं फॉर्म उत्कृष्ट आहे. २०१९-२० च्या रणजी ट्रॉफीतील हंगामात सहा महिन्यांमध्ये १५४.६६ च्या सरासरीने ९५२ धावा केल्या आहेत. शुक्रवारीही या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने अहमदाबादमध्ये सौराष्ट्रविरूद्ध २७५ धावा ठोकल्या आहेत.

सर्फराज खान आणि ऋतुराज गायकवाड यांना संघात समावेश न करण्याचा निर्णय टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांना आवडला नाही, असे त्यांनी म्हट्लंय. मला वाटतं संघ निवडताना निवडकर्त्यांनी त्यांच्या मेंदूचा वापर केलेले नाही.

सर्फराज खान आणि गायकवाड यांचा समावेश न करण्याचा निर्णय टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांना आवडला नाही. ते म्हणाले की, मला वाटतं संघ निवडताना निवडकर्त्यांनी त्यांच्या मेंदूचा वापर केलेला नाही. या दोन्ही खेळाडूंना का वगळण्यात आले याचे तुम्ही स्पष्टीकरण कसे द्याल, असे जवाब त्यांनी विचारला आहे. संघात अशा काही खेळाडूंचा समावेश आहे. ज्यामध्ये काही लोकांनी चांगलं प्रदर्शन केलेलं नाहीये.

वेंगसरकर यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ऋतुराज आणि सर्फराज संघात सहभाग होण्यास किंवा खेळण्यास पात्र होते. मात्र, टीम इंडियासाठी त्यांची निवड न करता त्या दोघांच्याही मनोधैर्याचं खच्चीकरण केलं जात आहे, असं वेंगसरकर म्हणाले.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर. अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

टी-२० मालिकेसाठी असा आहे उभय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, आवेश खान


हेही वाचा : Prakash Ambedkar : महाराष्ट्राच्या राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावं, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन