घरIPL 2020IPL 2020 : एका सामन्यानंतर कमिन्सवर टीका योग्य नाही - कार्तिक

IPL 2020 : एका सामन्यानंतर कमिन्सवर टीका योग्य नाही – कार्तिक

Subscribe

मुंबईविरुद्ध कमिन्सने अवघ्या ३ षटकांतच ४९ धावा खर्ची केल्या.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. या सामन्यात कमिन्सने अवघ्या ३ षटकांतच ४९ धावा खर्ची केल्या. मागील वर्षी झालेल्या आयपीएलच्या खेळाडू लिलावात कमिन्सला कोलकाताने १५.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. त्यामुळे कोलकाता संघ आणि चाहते यांना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पहिल्या सामन्यात त्याला या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत. मात्र, एका सामन्यानंतर त्याच्या कामगिरीविषयी काहीही बोलणे, त्याच्यावर टीका करणे योग्य नाही, असे कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला वाटते.

सामन्यात खेळला याचाच आनंद

केवळ एका सामन्यानंतर कमिन्सच्या कामगिरीवर टीका करणे योग्य नाही. त्याला काही काळ क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. सामना सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना त्याला सामन्यात खेळण्याची परवानगी मिळाली. तो या सामन्यात खेळला याचाच आम्हाला आनंद होता. त्यामुळे या सामन्यातील त्याच्या कामगिरीवर भाष्य करणे, त्यावर टीका करणे योग्य नाही. तो खूपच उत्कृष्ट गोलंदाज आहे. जे मी ऐकले आहे आणि पाहिले आहे, त्यावरून तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे हे सांगू शकतो. तो आगामी सामन्यांत चांगला खेळ करेल याची मला खात्री असल्याचे कार्तिक म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -