घरक्रीडाभारताच्या सात्विक, चिरागची फ्रेंच ओपनमध्ये कमाल; चायनीज तैपेई जोडीचा पराभव करत मिळवले...

भारताच्या सात्विक, चिरागची फ्रेंच ओपनमध्ये कमाल; चायनीज तैपेई जोडीचा पराभव करत मिळवले विजेतेपद

Subscribe

भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने रविवारी झालेल्या अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या लुचिंग याओ आणि यांग पो हान यांचा पराभव केला.

भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने रविवारी झालेल्या अंतिम फेरीत चायनीज तैपेईच्या लुचिंग याओ आणि यांग पो हान यांचा पराभव केला. या पराभवासह फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची ट्रॉफी जिंकली. (french open india satwik chirag created history by defeating chinese taipei pair)

जागतिक क्रमवारीत 8 व्या स्थानावर असलेल्या या जोडीने 48 मिनिटे चाललेल्या सामन्यात 25व्या क्रमांकावर असलेल्या चिंग आणि यांग जोडीचा 21-13, 21-19 असा पराभव केला. सात्विक आणि चिराग या जोडीच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी ट्रॉफी आहे.

- Advertisement -

या भारतीय पुरुष जोडीसाठी आतापर्यंतचे हे वर्ष उत्तम राहिले आहे. त्याने यावर्षी इंडियन ओपन सुपर 500 ट्रॉफी जिंकली. यानंतर बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक आणि ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, थॉमस कप ट्रॉफीही जिंकली.

या सामन्यात भारतीय जोडीने पहिल्या गेमपासून आघाडी घेत सामना नियंत्रणात ठेवला आणि बॅडमिंटनच्या आक्रमक शैलीमुळे तो जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांनी पहिल्यांदाच चायनीज तैपेईच्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करत सलग गुण मिळवले. तसेच, 6 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीतही भारतीय जोडीने जबरदस्त खेळी करत 20-16 अशी आघाडी घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – टी-20 विश्वचषकात महिला कॉमेंट्रेटरची पर्थ स्टेडियमच्या छतावर उलटे लटकून कॉमेंट्री

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -