घरक्रीडाIND vs PAK : महिला टी20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

IND vs PAK : महिला टी20 विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

Subscribe

महिला टी20 विश्वचषकात (Women's T20 World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. महिला टी-20 विश्वचषकातील भारताचा हा पहिला सामना आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर 'ग्रुप ब'मधील दोन्ही संघांची लढत होणार आहे.

महिला टी20 विश्वचषकात (Women’s T20 World Cup 2023) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. महिला टी-20 विश्वचषकातील भारताचा हा पहिला सामना आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर ‘ग्रुप ब’मधील दोन्ही संघांची लढत होणार आहे. भारताची धुरा हरनप्रीत कौरच्या हातात असून, पाकिस्तानची धुरा बिस्मा मारूफकडे आहे. (IND vs PAK India Pakistan match today in Women’s T20 World Cup)

भारतीय संघाची (Team India) उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुखापतीमुळे सामन्याबाहेर राहण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला सावध खेळी करावी लागणार असून, स्मृती मंधाना संघाबाहेर राहिल्यास तिची जागा कोण भरून काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

गेल्या वेळी आशिया चषक टी-20 सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने आज भारत मैदानात उतरेल.

महिला T20 विश्वचषकामध्ये दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले असून, हे दोन्ही संघ ब गटात आहेत. या गटात इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघही आहेत. पाच संघांच्या या गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याचप्रमाणे अ गटातही 5 संघ असून त्यापैकी दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.

- Advertisement -

रविवारी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर ‘ग्रुप ब’मधील दोन्ही संघांची लढत होणार आहे. भारताची धुरा हरनप्रीत कौरच्या हातात असून, पाकिस्तानची धुरा बिस्मा मारूफकडे आहे.

सामना कुठे खेळला जाईल? कधी सुरू होईल? कुठे लाइव्ह पाहाल?

महिला T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 12 फेब्रुवारीला (रविवारी) रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला टी-20 विश्वचषक सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता नाणेफेक होईल.
हॉटस्टार ॲपवर भारत-पाकिस्तान सामन्याचं लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

भारतीय संघाचे संभाव्य 11 खेळाडू

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.


हेही वाचा – ‘ही’ खेळाडू संघाबाहेर; भारतीय क्रिकेट संघाला ‘पाक’विरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठा धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -