Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी जाणून घ्या.. कोण आहेत राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस

जाणून घ्या.. कोण आहेत राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस

Subscribe

भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रमेश बैस यांची राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी रमेश बैस हे झारखंड राज्याचे 10वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. लवकरच ते महाराष्ट्र राज्याचे 20वे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रमेश बैस यांची राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी रमेश बैस हे झारखंड राज्याचे 10वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. लवकरच ते महाराष्ट्र राज्याचे 20वे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या राज्यपाल पदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी रमेश बैस हे झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत होते.

- Advertisement -

रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1948 रोजी रायपूर, मध्य प्रदेश (आता छत्तीसगडमध्ये) खोम लाल बैस यांच्या घरी झाला. त्यांनी भोपाळ येथून आपले बीएसई चे शिक्षण पूर्ण केले. 23 मे 1969 रोजी रमाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. बैस हे व्यवसायाने शेतकरी आहेत.

जाणून घ्या, रमेश बैस यांच्या राजकीय प्रवास
रमेश बैस हे 1978 मध्ये रायपूरच्या नगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांनी 1980 ची विधानसभा निवडणूक मंदिर हसद मतदारसंघातून जिंकली, परंतु 1985 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांनी त्यांचा पराभव केला.

- Advertisement -

हेही वाचा – भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर; रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

त्यांनी 1999 पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभारी) म्हणून काम केले होते. ते रायपूरमधून 9व्या (1989), 11व्या (1196), 12व्या, 13व्या, 14व्या (2004), 15व्या आणि 16व्या लोकसभेसाठी निवडून आले होते. त्यांनी पोलाद, खाण, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण आणि खाण आणि पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांसारख्या विविध खात्यांमध्ये काम केलेले आहे. तसेच झारखंडाचे 10वे राज्यपाल म्हणून देखील कार्यरत राहिलेले आहे. तर 2019 मध्ये रमेश बैस यांनी त्रिपुराचे 18वे राज्यपाल म्हणून देखील काम केलेले आहे.

भाजप पक्षाचा एक सामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून देखील रमेश बैस यांची ओळख आहे. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले आहे. रमेश बैस हे लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय समजले जातात आणि त्याचमुळे 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले नाही, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते. तर दुसरीकडे 2019 मध्ये लोकसभेचे तिकीट न देता रमेश बैस यांना लोकसभेच्या निवडणुका पार पडताच त्रिपुरा राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आले होते. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज आणि रमेश बैस यांचे भाव-बहिणीचे नाते होते.

- Advertisment -