घरक्रीडाआशिया चषक : पाकिस्तानचा 5 गडी राखून भारतावर दमदार विजय

आशिया चषक : पाकिस्तानचा 5 गडी राखून भारतावर दमदार विजय

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्स ठेवून भारताववर विजय मिळवला आहे. आशिया चषकातील सुपर-4 फेरीचा दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 6 विकेट्स ठेवून भारताववर विजय मिळवला आहे. आशिया चषकातील सुपर-4 फेरीचा दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, भारताने पहिले फलंदाजी करत 182 धावांचे आवाहन पाकिस्तानसमोर ठेवले. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने 6 विकेट्स आणि एक चेंडू राखून भारताचा 5 विकेट्सने पराभव केला. (ind vs pak pakistan beat india by 5 wickets in asia cup 2022)

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. यावेळी मोहम्मद रिझवान पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाकिस्तानसाठी 51 चेंडूत 71 धावांचं योगदान दिले. दरम्यान, भारताने दिलेल्या 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी चांगली सुरूवात केली. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बाबर 14 धावा करून बाद झाला.

- Advertisement -

फखर जमानने 18 चेंडूत 15 धावा केल्या. मोक्याची क्षणी मोहम्मद नवाजनं पाकिस्तानसाठी 20 चेंडूत 42 धावांची खेळी केली. यानंतर आसिफ अली आणि खुशदिल यांच्यात पाचव्या विकेटसाठी 17 चेंडूंत 33 धावांची भागीदारी झाली. तसेच, भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, आवेश खान आणि रवि बिश्नोईनं यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेली भारतीय सलामी जोडी केएल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी धमाकेदार सुरुवात केली. पण पॉवरप्लेपूर्वी कर्णधार रोहित (28) रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतानं पॉवर प्लेमध्ये 62 धावा केल्या. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसणारा राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शादाबच्या चेंडूवर बाद झाला. त्याने 28 धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. परंतु, 10 व्या षटकात नवाजने सूर्यकुमार यादवला बाद केले. या सामन्यातही ऋषभ पंतला काही खास कामगिरी करता आली नाही. शादाबने पंतला (14) बाद करून दुसरी विकेट मिळवली. तसेच, हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. त्यामुळं भारताचा निम्मा संघ 132 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

- Advertisement -

सातव्या क्रमांकावर आलेल्या दीपक हुडानं कोहलीसह 17.1 षटकांत संघाची धावसंख्या 150 वर नेली. दरम्यान, कोहलीनं हसनैनच्या चेंडूवर षटकार ठोकून या स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, सामन्याच्या अखेरच्या षटकात रौफने चांगली गोलंदाजी केली. ज्यामुळे भारताला 20 षटकात सात विकेट्स गमावून 181 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून शादाब खाननं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, हारिस रौफ आणि नवाजने प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.


हेही वाचा – रवी शास्त्रींनी टॉस टाईम.., म्हणताच रोहित शर्माला आवरले नाही हसू, व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -