घरक्रीडाIND vs SL : श्रीलंका दौऱ्यात द्रविड भारताचा प्रशिक्षक; बीसीसीआय सचिव जय...

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात द्रविड भारताचा प्रशिक्षक; बीसीसीआय सचिव जय शाह यांची माहिती

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेला १३ जुलैपासून सुरुवात होईल.  

भारताचा संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषणवणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली. भारताचा एक संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघामध्ये बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून हे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.

भारतीय संघाला दुसऱ्यांदा प्रशिक्षण 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत राहुल भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह मंगळवारी म्हणाले. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत आता द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षणपद भूषवेल. भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची ही द्रविडची दुसरी वेळ असेल. याआधी त्याने २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले होते.

- Advertisement -

भारताचे खेळाडू सोमवारी एकत्र आले

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचे खेळाडू सोमवारी एकत्र आले असून आता त्यांना सात दिवस कठोर क्वारंटाईन व्हावे लागेल. त्यानंतरचे पुढील सात दिवस क्वारंटाईनमध्ये असताना त्यांना इनडोअर सरावाची परवानगी असणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेसाठी २८ जूनला रवाना होणार असून श्रीलंकेत दाखल झाल्यावर त्यांना पुन्हा तीन दिवस कठोर क्वारंटाईन व्हावे लागेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेला १३ जुलैपासून सुरुवात होईल.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -