Eco friendly bappa Competition
घर क्रीडा IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा दमदार विजय

IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा दमदार विजय

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने हा सामना ६७ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या सलामीवीरांची चांगली सुरूवात आणि रनमशीन विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३७३ धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले होते.

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने हा सामना ६७ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या सलामीवीरांची चांगली सुरूवात आणि रनमशीन विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३७३ धावांचे आव्हान श्रीलंकेसमोर ठेवले होते. मात्र, भारताने दिलेल्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. केवळ श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने अखेरपर्यंत संघर्ष केला. (India have defeated Sri Lanka by 67 runs in the first ODI)

रनमशीन विराट कोहलीचे विक्रमी शतक आणि रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला. विराट कोहलीने आज वनडे क्रिकेटमधील ४५वे शतक झळकावताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडले. विराटने ८७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११३ धावा केल्या. विराटचे सोडलेले दोन झेल श्रीलंकेला महागात पडले. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी १४३ धावांची सलामी खेळी केली. शुभमन याने ६० चेंडूंत ११ चौकार मारत ७० धावा केल्या. तसेच, रोहित शर्मा याने ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकार मारत ८३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला अय्यर २८ धावांवर झेलबाद झाला.

- Advertisement -

भारतीय संघाच्या गोलंदाजीवेळी मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडो व कुसल मेंडिसला बाद केले. सलामीवीर पथूम निसंका आणि चरिथ असलंका यांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, चरिथ २३ धावांवर उम्रानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. उम्रानने आजच्या सामन्यात 156kmph वेगाने चेंडू टाकला आणि तोच चेंडू वनडे क्रिकेटमधील भारतीयाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला.

निसंका व धनंजया डी सिल्वा या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. निसंकाने अर्धशतक झळकावताना ७२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने अनुभव कामी आणताना धनंजयाला ( ४७) बाद केले. उम्रानच्या वेगवान गोलंदाजीवर फटका मारण्याचा निसंकाचा प्रयत्न फसला अन् अक्षर पटेलने सोपा झेल घेतला. निसंका ८० चेंडूंत ११ चौकारांसह ७२ धावांवर बाद झाला.

- Advertisement -

कर्णधार दासून शनाकाने संघर्ष दाखवताना शतक पूर्ण केले. परंतु श्रीलंकेला हार मानावी लागली. त्यांनी ८ बाद ३०६ धावांपर्यंत मजल मारली. शनाकाने ८८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०८ धावा केल्या.


हेही वाचा – IND vs SL: विराटची पुन्हा शतकी खेळी, तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून ४ शतकं दूर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -