घरक्रीडाटीम इंडियाची पुढची धुरा कोणत्या खेळाडूच्या हाती? रणमशीन कोहलीला BCCI कडून डच्चू...

टीम इंडियाची पुढची धुरा कोणत्या खेळाडूच्या हाती? रणमशीन कोहलीला BCCI कडून डच्चू मिळण्याची शक्यता

Subscribe

१७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला होणार सुरूवात

नवी दिल्ली : टीम इंडियाचं (Team India) पुढील नेतृत्व कोणता खेळाडू करणार याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. टी-२० वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. टीम इंडियाच्या टी-२० फॉरमॅटचा नवा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) बनवण्यात आले आहे. १७ नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार कोण असणार?, याबाबत बीसीसीआयकडून लवकरच खुलासा करण्यात येणार आहे.

टी-२० वर्ल्ड कपनंतर रणमशीन विराट कोहली पायउतार होणार असल्याची माहिती विराटने त्याच्या ट्विटद्वारे दिली होती. त्यामुळे कर्णधारपदाच्या ओझ्यातून विराटने मुक्त होऊन फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रीत करावे, अशी इच्छा बोर्डाने व्यक्त केली आहे. विराट कोहली जरी खराब फॉर्ममध्ये नसला तरी २०१९ पासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकही झळकावता आलेले नाहीये. आगामी वर्षातील जानेवारी महिन्यात टीम इंडिया एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे टी-२० संघानंतर एकदिवसीय मालिकेची धुरा रोहित शर्मा की केएल राहुल सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

एकदिवसीय मालिकेला ११ जानेवारीपासून सुरूवात होणार

एकदिवसीय मालिकेला ११ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी टीम इंडिया डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन कसोटी, तीन वनडे आणि चार टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. तसेच माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला संघाचा नवा प्रशिक्षक बनवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या टी-२० सिरीज आणि पहिल्या कसोटी सामन्यामध्ये विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विराट दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आपलं पुनरागमन करणार आहे.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला धक्का

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने खराब कामगिरी केली आहे. पहिल्याच सामन्यामध्ये पाकिस्तान संघाने टीम इंडियाची दांडी गुल केली. त्यानंतर मात्र, टीम इंडियाची दिशा वेगळ्याच मार्गाने गेली. हा संघ सुपर-१२ मधूनच बाहेर पडला. परंतु काल(गुरूवार) झालेल्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात पाकचा पराभव झाला. ऑस्ट्रेलिया संघाने उत्कृष्ट खेळी करत अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा धडक मारली. येत्या रविवारी १४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने-सामने भिडणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा: टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकला मोठा झटका, हसन अलीला गोळी मारा..,पाकिस्तानी संतापले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -