घरक्रीडारॉबिन उथप्पाला कन्यारत्न, मुलीच्या नावाची जोरदार चर्चा

रॉबिन उथप्पाला कन्यारत्न, मुलीच्या नावाची जोरदार चर्चा

Subscribe

भारतीय संघाचा आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पा याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. रॉबिन उथप्पा याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. दुसऱ्यांदा रॉबिन उथप्पा बाबा झाला आहे.

भारतीय संघाचा आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पा याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. रॉबिन उथप्पा याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. दुसऱ्यांदा रॉबिन उथप्पा बाबा झाला आहे. विशेष म्हणजे त्याने मूलीचे नावही एकदम खास ठेवले असून, तिच्या नावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (indian cricketer robin uthappa blessed with baby girl names her trinity thea uthappa)

रॉबिन उथप्‍पा याने त्याच्या मुलीचं नाव ट्रिनिटी थिया उथप्पा (Trinity Thea Uthappa) असे ठेवले आहे. मुलीचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा असे ठेवल्यामुळे रॉबिनच्या चाहत्यांनी तिचे स्वागत केले आहे. तसेच सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रॉबिन उथप्पा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ROBIN UTHAPPA (@robinaiyudauthappa)

- Advertisement -

ट्रिनिटीचा फोटो रॉबिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तसेच, “प्रेमाने भरलेल्या मनाने आम्ही आमच्या घरी नव्या पाहुण्याला सर्वांसमोर आणू इच्छितो, भेटा माझी मुलगी ट्रिनिटी थिया उथप्पाला. जगात तू आम्हाला आई-वडिल म्हणून निवडले यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. मला आणि शितलला पालक म्हणून निवडण्याकरता तुझे आभार”, असे त्याने लिहिले.

रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने 2015 साली त्याची प्रेयसी शीतलशी लग्न केले. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते, ज्यानंतर त्यांनी लग्न केलं. भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पा हा ईसाई (Christian) धर्माचा असून, त्याची पत्नी शीतल हिंदू आहे. दोघांनाही विवाह करताना धर्म वेगवेगळा असल्याने अडचणींचा सामना करावा लागला होता. पण लग्नानंतर दोघेही घरच्यांची मान्यता मिळवण्यात यशस्वी झाले.

- Advertisement -

हेही वाचा – वाईट वेळही निघून जाईल.., विराट कोहलीच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या बाबर आझमचं मोठं वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -