घरक्रीडाIND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसन भारतीय संघाचा...

IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेसाठी संजू सॅमसन भारतीय संघाचा उपकर्णधार?

Subscribe

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरूवात होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. मात्र, या मालिकेसाठी भारतीय संघाचा यष्टीरक्षक संजू सॅमसन उपकर्णधार असणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Indian Wicket keeper Sanju Samson Vice Captain For India Vs South Africa Odi Series)

इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संजू सॅमसनला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. उद्यापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 खेळणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.

- Advertisement -

या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले नाही. यानंतर अनेक तज्ञांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.

संजू सॅमसनने आतापर्यंत टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यांच्या 6 डावांमध्ये 44 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. अर्धशतक केले आहे. सॅमसनचा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आहे. त्याने आतापर्यंत 103 डावात 31 च्या सरासरीने 2806 धावा केल्या आहेत. एक शतक आणि 15 अर्धशतके केली आहेत.

- Advertisement -

नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळाली नव्हती. मात्र, टी-20 खेळाचा विचार करता संजू सॅमसनने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. याशिवाय, इंडियन प्रिमीयर लीग आयपीएलमध्येही संजूने दमदार फलंदाजी करत गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता.


हेही वाचा – ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचण्यासाठी भारतीय संघ सज्ज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -