घरक्रीडापृथ्वी शॉची फ्लॉप खेळी; आयपीएलमध्ये संघात टिकून राहणं अवघड

पृथ्वी शॉची फ्लॉप खेळी; आयपीएलमध्ये संघात टिकून राहणं अवघड

Subscribe

सध्या आयपीएलचं १५ वं पर्व सुरू असून, यामध्ये पृथ्वी शॉ मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्याची ही खेळी अशीच राहिल्यास त्याला आयपीएलच्या संघातून बाहेर काढलं जाऊ शकतं.

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्स या संघात खेळणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सतत होणाऱ्या फ्लॉप खेळीमुळं मागील अनेक काळापासून पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये पृथ्वी शॉ चांगली कामगिरी करेल अशी, आशा क्रिकेटप्रेमींना होती. मात्र, एकंदरीत पृथ्वीची खेळी पाहता त्याच्या फलंदाजीत सुधारणा नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं पृथ्वी शॉनं फलंदाजीत सुधारणा न केल्यास त्याला आयपीएलच्या पुढील सामन्यात स्थान मिळणं अशक्य होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या आयपीएलचं १५ वं पर्व सुरू असून, यामध्ये पृथ्वी शॉ मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्याची ही खेळी अशीच राहिल्यास त्याला आयपीएलच्या संघातून बाहेर काढलं जाऊ शकतं. आयपीएलच्या या पर्वात पृथ्वी शॉनं गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १० धावा केल्या होत्या. तर, मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ ३८ धावा करता आल्या.

- Advertisement -

भारतीय संघात निवड होण्यापूर्वी पृथ्वी शॉची फलंदाजी पाहता त्याची तुलना माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्यासोबत करण्यात येते. सचिन व सेहवाग प्रमाणेच हा खेळत असल्याचं क्रिकेटप्रेमींच मत आहे. दरम्यान, एकेकाळी भारतीय संघात खेळत असताना या दोन्ही माजी सलामीवीरांनी विरोधीसंघांचा चांगलाच समाचार घेतला होता. शतकी खेळी आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळायचा.

आयपीएल २०२२मध्ये पृथ्वी शॉने गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १० धावा केल्या. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला १४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तसंच, मुंबई इंडियन्सविरुद्धही पृथ्वी शॉ मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि ३८ धावा करून बाद झाला. कोणत्याही संघाला विजयासाठी सलामीच्या जोडीची यशस्वी खेळी अत्यंत महत्वाची असते. मात्र पृथ्वीच्या फ्लॉप खेळीमुळं संघाचा सर्व भार हा मधल्या फळीतील खेळाडूंवर येत असल्याचं दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पाहायाला मिळतं.

- Advertisement -

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटपासून पृथ्वी शॉ सध्या लांब आहे. याआधी पृथ्वी शॉनं ५ कसोटी खेळला असून, यामध्ये ३३९ धावा केल्या आहेत. तसंच, ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. आतापर्यंत ५३ आयपीएल सामने खेळला असून, यामध्ये १३०५ धावा केल्या आहेत. दरम्यान, खेळाडूंची फिटनेस टेस्ट अर्थात यो यो टेस्ट केली जात असून यामध्येही पृथ्वी शॉ फेल झाला होता.


हेही वाचा – IPL 2022: पंजाब किंग्जच्या ‘या’ खेळाडूनं मारला यंदाच्या पर्वातील सर्वात लांब षटकार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -