घरक्रीडाIPL 2022 : 'तुम्ही तुमचे काम करा' यो-यो टेस्टवरुन ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी...

IPL 2022 : ‘तुम्ही तुमचे काम करा’ यो-यो टेस्टवरुन ट्रोल करणाऱ्यांना पृथ्वी शॉचे उत्तर

Subscribe

भारतीय क्रिकेय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA)मध्ये घेण्यात आलेल्या यो-यो टेस्टमध्ये फेल झाला होता. यो-यो चाचणीमध्ये फेल झाल्यामुळे पृथ्वी शॉला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेटकऱ्यांनी शॉला सोशल मीडियावर ट्रोल केले यानंतर पृथ्वी शॉने प्रत्युत्तर देऊन ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिलं आहे. ट्रोलर्सनी कोणत्याही प्रकारे माझे मूल्यांकन करु नये , तुम्ही तुमचे काम करा उत्तर पृथ्वी शॉने दिले आहे. आयपीएलमध्ये सहभागी होण्यापूर्वी एनसीएने खेळाडूंची चाचणी घेतली. या एनसीए कॅम्पमध्ये सर्वच भारतीय खेळाडूंना टेस्ट द्यावी लागते. टेस्टमध्ये पास झाल्यावरच त्याला आयपीएलच्या संघात सहभागी होता येते.

भारतीय संघाचा उत्कृष्ट फलंदाज आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर खेळाडू पृथ्वी शॉला एनसीएची यो-यो टेस्ट मध्ये अपयश आले आहे. तर गुजरात टाइटंसचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पास झाला आहे. टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे पृथ्वी शॉ सोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. यामध्ये काही ट्रोलर्सने त्याला ट्रोल केले होते. यावर पृथ्वी शॉने उत्तर दिले आहे. ‘माझी परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय माझ्याबाबत कोणतेही तर्क लावू नका, तुम्ही तुमचे काम करा’ अशा आशयाची पोस्ट पृथ्वी शॉने इंस्टाग्रामवर केली आहे.

- Advertisement -

टेस्ट फेल झाला तरी आयपीएल खेळणार

भारतीय खेळाडू्ंची यो-यो टेस्ट बंगळुरुमध्ये नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये घेण्यात आली होती. बीसीसीआयच्या यादीत सहभागी असलेल्या सगळ्या खेळाडूंना आयपीएल खेळण्यापूर्वी ही टेस्ट द्यावी लागते. तसेच या टेस्टेमध्ये पास होणं गरजेचे आहे. पृथ्वी शॉसाठी दिलासादायक बाब आहे की, तो फेल झाला असला तरी आयपीएल खेळू शकतो कारण तो बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये नाही.

पृथ्वी शॉ मागील काही दिवसांपासून आपल्या खराब प्रदर्शनाला समोरे जात आहे. यामुळे त्याला संघात स्थान निश्चित करता आले नाही. शॉ ५ ते १४ मार्च या कालावधीत एनसीए कॅम्पमध्ये दाखल झाला होता. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी आयपीएलसाठी फिटनेस चाचणी घेतली जाते. या चाचणीमध्ये पास होण्यासाठी शॉला २३ पैकी १६.५ गुण मिळवायचे होते परंतु त्याला १५ गुणही मिळवता आले नाही.

- Advertisement -

हेही वाचा : Harbhajan Singh : फिरकीपटू हरभजन सिंहला राज्यसभेत उमेदवारी, पंजाबमध्ये आपचे सरकार येताच केजरीवालांचा मोठा निर्णय

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -