IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या पर्वातील बंगळुरूचा पहिला विजय; कोलकाताचा 3 गडी राखून पराभव

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ वा हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं कोलकाताविरोधात काल पहिला विजय मिळवला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांच्या जोरावर बंगळुरूनं ३ गडी राखून कोलकाताचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करत कोलकातानं १२९ धावांचं लक्ष्य बंगळुरू समोर ठेवलं होतं. १२० चेंडुत अगदी सहज पुर्ण होईल असं हे आव्हान होतं.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ वा हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं कोलकाताविरोधात काल पहिला विजय मिळवला. बंगळुरू संघाच्या गोलंदाजांच्या जोरावर बंगळुरूनं ३ गडी राखून कोलकाताचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करत कोलकातानं १२९ धावांचं लक्ष्य बंगळुरू समोर ठेवलं होतं. १२० चेंडुत अगदी सहज पुर्ण होईल असं हे आव्हान होतं. परंतु, या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूच्या संघाला चांगली सुरूवात करता आली नाही. मात्र, कोलकाताच्या गोलंदाजांनी एवढ्या कमी धावसंख्येला चुरशीची लढच दिल्याचं या सामन्याच पाहयला मिळालं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. अखेर बंगळुरूनं हे १२९ धावांचं लक्ष्य पार करत आयपीएलच्या १५ व्या पर्वातील पहिला विजय मिळवला.

कोलकाताने दिलेले १२९ धावांचे लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचे सलामीचे फलंदाजी स्वस्त:त बाद झाले. कर्णधार फाफ डू प्लेलिस (५), अनुज रावत (०) बाद झाला सर्व जबाबदारी विराटवर येऊन पडली. मात्र विराटनेही सर्वांची निराशा केली. विराट जलद गोलंदाज उमेश जाधवच्या चेंडूवर अवघ्या १२ धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर मात्र कोलकाताने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरुला मोठी कसरत करावी लागली.

डेविड वेली (१८), रुदरफोर्ड (२८) शाहबाज अहमद (२७) यांनी संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. बंगळुरुच्या हातातून सामना जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी जबाबदारीने खेळत शेवटच्या क्षणी अनुक्रमे १४ आणि १० धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुला या हंगामातील पहिला विजय मिळवता आला.

या सामन्यात नाणेफेक जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बंगळुरूच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या फलंदाजांना धावा बनवणं कठीण केलं होतं. बंगळुरुच्या कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत योग्य ठरवला. यामध्ये ३ वर्षे क्रिकेटपासून दूर राहणारा आकाश दीप यांने चांगली कामगिरी केली. त्यानं ४ षटकात ४५ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळं कोलकाताच्या धावसंख्येला ब्रेक लागला.

सामन्याच्या सुरुवातीला चौथे षटक सुरु असताना आकाश दीपने व्यंकटेश अय्यरला अवघ्या १० धावांवर बाद केले. सिराज अहमदने टाकलेल्या चेंडूवर रहाणेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ९ धावांवर झेलबाद झाला. आकाश दीपने हा झेल पकडला. त्यानंतर कोलकाता संघ ४४ धावांवर असताना आकाश दीपने नितिश राणाचा बळी घेतला. राणा अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र हसरंगाने त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या १३ धावांवर बाद केले. त्यापाठोपाठ कोलकाता संघ ६७ धावांवर असताना हसरंगाने नरेनला १२ धावांवर तंबुत पाठवले.

या सामन्यात हसरंगाने २ बळी घेतल्यानंतर कोलकाताची स्थिती ६७ धावांवर ५ गडी बाद अशी झाली. त्यापाठोपाठ हसरंगाने लगेच जॅक्सनचा त्रिफळा उडवला. या बळीनंतर कोलकाताची स्थिती ६७ धावांवर सहा गडी बाद अशी झाली. हसरंगानंतर कोलकाताला रोखण्याची जबाबदारी हर्षल पटेलने घेतली. पटेलने बिलिंग्स (१४), रसेल (२५) या दोन फलंदाजांना बाद केले. शेवटी टिम साउथी मैदानावर टीकू शकला नाही. त्याला हसरंगाना शून्यावर बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न केला. उमेशने १८ धावा आणि चक्रवर्तीने (नाबाद) १० घावा केल्यामुळे कोलकाता संघ १२८ धावा करु शकला.


हेही वाचा – Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलचे वाढते दर सर्वसामान्यांसाठी ठरतायत डोकेदुखी