युजवेंद्र चहल ठरला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज; फिरकीपटू हरभजनचा मोडला विक्रम

युजवेंद्र चहल उत्तम गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्ले ऑफमध्ये (IPL Play Off) स्थान मिळवले आहे. यंदा युजवेंद्र चहलने 14 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, एकदा चार आणि पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. यंदाच्या पर्वात चहलने अधिक भेदक मारा करत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगमधील (Indian Primier League 2022) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. युजवेंद्र चहलने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली आहे. यंदाची पर्पल कॅपच्या (purple cap) शर्यतीत चहल अव्वल स्थानी आहे. या पराक्रमासह चहलने दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहचा (harbhajan singh) विक्रमही मोडीत काढला आहे.

युजवेंद्र चहल उत्तम गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्ले ऑफमध्ये (IPL Play Off) स्थान मिळवले आहे. यंदा युजवेंद्र चहलने 14 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, एकदा चार आणि पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. यंदाच्या पर्वात चहलने अधिक भेदक मारा करत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. राजस्थान रॉयल्सने यंदा चहलला 6.50 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले होते. याआधी चहल आरसीबी संघाचा भाग होता.

हेही वाचा – DC vs MI Match IPL : जर आमचा पराभव झाला तर.., सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचं मोठं विधान

हरभजनचा विक्रम मोडला

यंदाच्या पर्वात चहलने हरभजनचा विक्रम मोडला आहे. याआधी आयपीएलमध्ये एका पर्वात सर्वाधिक विकेट (Most wickets) घेण्याचा मान हरभजनच्या नावावर होता. हरभजनने आयपीएल 2013 मध्ये 24 विकेट घेतल्या होत्या. यजुवेंद्र चाहलने हा विक्रम मोडीत काढला आहे.

14 साखळी सामन्यापैकी 9 सामन्यात विजय

राजस्थान रॉयल्सने यंदा संजू सॅमसनच्या (sanju samson) नेतृत्वातील 14 साखळी सामन्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना केला. राजस्थानचा संघ आयपीएलच्या (IPL) गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान आणि लखनऊ या दोन्ही संघाचे समान गुण आहे. मात्र सरस नेटरनरेटच्या जोरावर राजस्थानने दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. तसेच, नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (hardik pandya) नेतृत्वात हैदराबादच्या संघान 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 20 गुणांसह (+0.316) गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

प्लेऑमध्ये गुजरात, राजस्थान, लखनऊ सुपर जायंट्सचे स्थान निश्चित

आयपीएल 2022 च्या प्लेऑमध्ये गुजरात, राजस्थान, लखनऊ सुपर जायंट्सचे स्थान निश्चित झाले आहे. राजस्थानचे 9 सामने जिंकून 18 गुण (+0.298) झाले आहेत. त्यानंतर लखनऊचा संघ 18 गुणांसह (+0.251) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या चौथ्या क्रमांकासाठी बंगळुरू आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा सुरू आहे. बगंळुरूचे 16 गुण आहेत. तर, दिल्लीचे 14 गुण आहेत. इंडियन प्रमिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. सध्या खेळत असलेल्या संघांमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरस रंगल्याचे पाहायला मिळते. तसेच, आता प्लेऑफ (Play Off) गाठण्यासाठी चौथ्या क्रमांकावर कोणत्या संघाची वर्णी लागणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही.

कोलकातामध्ये राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.


हेही वाचा – CSK vs RR IPL 2022: रियान परागने मोडला रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाचा विक्रम, आता एबी डिव्हिलियर्सवर लक्ष्य