Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा धोनीला मेंटॉर केल्याचे जडेजाला खटकले, म्हणाला एका रात्रीत काय...

धोनीला मेंटॉर केल्याचे जडेजाला खटकले, म्हणाला एका रात्रीत काय…

धोनीचा माझ्या एवढा कोणी दुसरा चाहता नसेल.

Related Story

- Advertisement -

बीसीसीआयकडून ट्वेंटी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताचा फलंदाज विराट कोहली कर्धार तर रोहित शर्माची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे संघात पुनरागमन झालं आहे. धोनीला टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून निवडले आहे. परंतु महेंद्रसिंग धोनीला मेंटॉर केल्याचे माजी खेळाडू अजय जडेजा याला खटकलं आहे. एका रात्रीमध्ये असं काय घडलं की, भारतीय संघाला मार्गदर्शकाची गरज पडली? असा प्रश्न अजय जडेजाने उपस्थित केला आहे. फिरकीपटू आर आश्विनचेही ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झालं आहे. या दोन खेळाडूंच्या पुनरागमनामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

महेंद्रसिंग धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून निवडल्यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटलं आहे की, मंहेंद्रसिंग धोनीसोबत मेंटॉरच्या जबाबदारीबाबत बोलणं झालं आहे. धोनीची ही जबाबदारी पार पाडण्यामध्ये काही हरकत नाही आहे. तसेच संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली असून त्यांनाही याबाबत काही हरकत नाही आहे. या सर्वांना आपला निर्णय पटला असल्याचे जय शाह यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

संघातील खेळाडूंना हा निर्णय पटला असला तरी जडेजाने यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. जडेजाने म्हटलं आहे की, भारतीय संघ विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे. यामुळे मार्गदर्शकाची गरज नव्हती. संघाला जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानात घेऊन नेणारे प्रशिक्षक सोबत असताना अचानक एका रात्रीमध्ये भारतीय संघाला मेंटॉरची गरज का पडली? याचं आश्चर्य वाटत असल्याचे अजय जडेजाने म्हटलं आहे.

जडेजाने पुढे म्हटलं आहे की, धोनीचा माझ्या एवढा कोणी दुसरा चाहता नसेल. धोनी असा कर्णधार आहे ज्याने संघ सोडण्यापुर्वी पुढील कर्णधार आपल्या नेतृत्वात तयार केला आहे. विराट कोहली धोनीसोबत क्रिकेट खेळत होता. धोनीचे खेळाबद्दल न्याय आणि विचार करण्याची पद्धत तो संघात नसताना कशी कामी येईल याचा विचार करत असून हे न उलघडलेलं कोड आहे. संघात दोन वेगळा विचार करणाऱ्या लोकांना एकत्र आणलं जात आहे. धोनी फिरकीपटू गोलंदाजांना एकत्र घ्यायचा त्याने कधी जलदगती गोलंदाजांना एकत्र घेऊन सामना खेळला नाही. तर इंग्लंडच्या सामन्यात जलदगती गोलंदाजांना घेऊन सामना खेळण्यात आला यामुळे दोन वेगळ्या विचार सरणीच्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत जडेजानं व्यक्त केलं आहे.

- Advertisement -