घरक्रीडाMI vs RCB Match : मुंबईचा सलग दुसरा विजय; बंगळुरूचा 7 गडी...

MI vs RCB Match : मुंबईचा सलग दुसरा विजय; बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने दुसरा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 197 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. सलामीवीरांपासून सर्व खेळाडूंनी चांगली खेळी केली.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने दुसरा विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 197 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात केली. सलामीवीरांपासून सर्व खेळाडूंनी चांगली खेळी केली. विशेष म्हणजे मुंबईच्या नावे या सामन्यात यंदाच्या आयपीएलमधील दोन विक्रमांची नोंद झाली आहे. त्यानुसार, जसप्रीत बुमराहने पाच गडी बाद केले. तसेच, सूर्यकुमार यादव याने केवळ 17 चेंडूत आपले अर्धशकत पूर्ण केले. (MI vs RCB Match Mumbai Indians Beat Royal Challengers Bangaluru by 7 Wickets IPL 2024)

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या सामन्यात बुमराहने पाचव्यांदा विराट कोहली यादा बाद केले. विराट केवळ तीन धावांवर बाद झाला. मात्र कर्णधार फाफ डु प्लेसीस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी अर्धशतकी खेळी करत बंगळुरूची धावसंख्या 196 वर नेली. तसेच, 197 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Sharma : MI मालक आणि ‘मुंबई’चा राजा हिटमॅनचा एकाच गाडीतून प्रवास; पडद्यामागे काही घडतंय?

या सामन्यात गोलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बुमराहने चार षटकांत 21 धावा देत पाच गडी बाद केले. तसेच, जेराल्ड कोएत्झी, आकाश मधवाल आणि श्रेयश गोपाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजी आक्रमक खेळी केली. सालमीवीर रोहित शर्मासह ईशान किशान यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. सलामीवीर ईशान किशन याने 34 चेंडूत पाच षटकार, सात चौकार मारत 69 धावा केल्या. तसेच, रोहित शर्मा याने 24 चेंडूत 38 धावा केल्या. त्याचप्रमाणे सूर्यकुमार यादव याने 19 चेंडूत 52 धावा केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – Mi vs Rcb Match : बुमराह ठरला पर्पल कॅपचा मानकरी; कोहलीला केले पाचव्यांदा आऊट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -