घरक्रीडा'दोहा डायमंड लीग'ते विजेतेपद नीरज चोप्राने पटकावले; स्पर्धेतील थ्रो ठरला सर्वोत्तम

‘दोहा डायमंड लीग’ते विजेतेपद नीरज चोप्राने पटकावले; स्पर्धेतील थ्रो ठरला सर्वोत्तम

Subscribe

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने (Neeraj Chopra) शुक्रवार 5 मे रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला.

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने (Neeraj Chopra) शुक्रवार 5 मे रोजी दोहा डायमंड लीगचे विजेतेपद पटकावले आहे. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला. नीरजचा हा पहिलाच फेक स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दोहा डायमंड लीगमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा चेक खेळाडू जेकोब वडलेज्च दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. (neeraj chopra wins doha diamond league 2023 team india star javelin thrower gold medal)

दोहा येथे होणारा हा कार्यक्रम डायमंड लीग सीरिजचा पहिला टप्पा आहे. 16 आणि 17 सप्टेंबर रोजी यूजीनमध्ये डायमंड लीग फायनलसह या स्पर्धेचा समारोप होणार आहे. डायमंड लीगच्या एका लेगमध्ये प्रत्येक खेळाडूला पहिल्या क्रमांकासाठी 8, द्वितीय क्रमांकासाठी 7, तृतीय क्रमांकासाठी 6 आणि चौथ्या क्रमांकासाठी 5 गुण दिले जातात.

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सने नीरज चोप्राचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.

नीरज चोप्राची कामगिरी

- Advertisement -
 • पहिला प्रयत्न : 88.67 मीटर
 • दुसरा प्रयत्न : 86.04 मीटर
 • तिसरा प्रयत्न : 85.47 मीटर
 • चौथा प्रयत्न : फाउल
 • पाचवा प्रयत्न : 84.37 मीटर
 • सहावा प्रयत्न : 86.52 मीटर

दोहा डायमंड लीगची फायनल स्टँडिंग

 • निरज चोप्रा (भारत) : 88.67 मीटर
 • जॅकब वडलेज्च (चेक गणराज्य) : 88.63 मीटर
 • एंडरसन पीटर्स (ग्रेनाडा) : 85.88 मीटर
 • जुलियन वेबर (जर्मनी) : 82.62 मीटर
 • एंड्रियन मर्डारे (मोल्डोवा) : 81.67 मीटर
 • केशोर्न वाल्कॉट (त्रिनिदाद एंड टोबॅगो) : 81.27 मीटर
 • रोड्रिक जी. डीन (जापान) : 79.44 मीटर
 • कर्टिस थॉम्पसन (यूएसए) : 74.13 मीटर

हेही वाचा – ‘काही आंडूपाडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्या’, ‘सामना’च्या अग्रलेखातून राणेंवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -