घरक्रीडामॅच फिक्सिंग प्रकरण; पाकिस्तानच्या उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी

मॅच फिक्सिंग प्रकरण; पाकिस्तानच्या उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी

Subscribe

पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक कारवाई करण्याचे धोरण हाती घेतले आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर बुकींची भेट घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तपालन समितीनी ही शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आचारसंहिता कलम २.४.४ नुसार उमरवर आरोप निश्चित करण्यात आले होते. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश ए. मिरान. चौहान यांनी चौकशी केल्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. उमर अकमल आता ३ वर्षांसाठी पाकिस्तानसाठी कोणताही सामना खेळू शकणार नाही. इतकच काय तर त्याला पाकिस्तान सुपर लीगमध्येही (PSL) खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

उमर अकमलवर बंदी घालण्यात आल्यानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करत ते म्हणाले की, “शेवटी उमर अकमल देखील मुर्ख्यांच्या यादीत सामील झाला. ३ वर्षांची बंदी. आपल्या कौशल्याला अशा पद्धतीने त्याने उध्वस्त केले आहे. पाकिस्तानमध्ये आता मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून जाहीर केले पाहीजे आणि अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवे.”

- Advertisement -

उमर अकमलने फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीत १६ कसोटी सामने खेळले होते. ज्यामध्ये १००३ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि ६ अर्धशतक ठोकले होते. तसेच १२१ एकदिवसीय सामन्यात त्याने ३१९४ धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यात २ शतक आणि २० अर्धशतक त्याच्या नावावर होते. उमरने शेवटचा कसोटी सामना २०११ साली खेळला होता. तर शेवटचा टी-२० सामना श्रीलंकाच्या विरोधात २०१९ साली लाहोरमध्ये खेळला होता.

रमीझ राजा यांच्याप्रमाणेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांनी देखील मॅच फिक्सिंगवर टीका केली होती. जे खेळाडू फिक्सिंग करतील त्यांना थेट फासावर लटकवा अशी शिक्षा त्यांनी सुचवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -