घरक्रीडाRahul dravid: राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक; न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेपासून स्वीकारणार कारभार

Rahul dravid: राहुल द्रविड भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक; न्यूझीलंडविरूध्दच्या मालिकेपासून स्वीकारणार कारभार

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडकडे भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. काही दिवसापूर्वी राहुल द्रविडने आपल्या प्रशिक्षक पदाचा अर्ज बीसीसीआयकडे सोपवला होता. ४८ वर्षीय राहुल सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष आहे. त्याने यापूर्वीही श्रीलंकेसोबतच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळला आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकानंतर भारतीय संघाची न्यूझीलंड सोबत कसोटी आणि टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. न्यूझीलंडच्या मालिकेपासून द्रविड आपल्या पदाचा कारभार स्वीकारणार आहे.

द्रविड सध्या १९ वर्षाखालील भारत अ संघाचा प्रशिक्षक पदाचा कारभार पाहत आहे. द्रविडला याआधीही प्रशिक्षक पदाबद्दल विचारणा झाली होती. मात्र द्रविडने क्रिकेटचे धडे देण्याला आणि अकादमीचे काम पाहण्याचे कारण देत प्रशिक्षक पदाला नकार दिला होता.

- Advertisement -

प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर द्रविड म्हणतो…..

“भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणे ही एक अतिशय सन्मानाची बाब आहे. मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे, आणि मी हे करण्यासाठी संघासोबत काम करण्याची आशा करतो. अशा शब्दांत राहुल द्रविडने बीसीसीआयच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.

 

- Advertisement -

हे ही वाचा: Khel Ratna Award 2021: मेजर ध्यानचंद पुरस्कार मिळाल्यानंतर नीरज चोप्राने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -