घरक्रीडाVirat Kohli: 'किंग कोहली' लहाणपणी 'अशी' जिंकायचा शर्यत; प्रशिक्षक, मित्राने केली पोलखोल,...

Virat Kohli: ‘किंग कोहली’ लहाणपणी ‘अशी’ जिंकायचा शर्यत; प्रशिक्षक, मित्राने केली पोलखोल, वाचा रंजक गोष्टी

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी किंग कोहलीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. दरम्यान, एक क्षणही आठवून ते भावूक झाले.

विराट कोहली सध्या आयपीएल 2023 खेळत आहे आणि तो आतापर्यंतच्या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला आहे. या हंगामातील काही सामन्यांमध्ये कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या अनुपस्थितीत त्याने आरसीबीची जबाबदारीही घेतली होती. दरम्यान, त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी विराट कोहलीमुळे भावूक झालेल्या क्षणाविषयी सांगितले. ( Sports news IPL 2023 Virat Kohli childhood coach rajkumar Sharma told when hw bacame captain of all formats that was a very emotional moment  )

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी किंग कोहलीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. दरम्यान, एक क्षणही आठवून ते भावूक झाले. राजकुमार शर्मा म्हणाले, “विराट कोहली जेव्हा सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनला तेव्हा त्याने मला फोन केला आणि म्हणाला, ‘सर, मी सायकलवर यायचो, समोर किट बॅग घेऊन, मला वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेन’ – तो खूप भावनिक क्षण होता.

- Advertisement -

विराट कोहलीच्या मित्राने सांगितले की, प्रशिक्षक खेळाडूंना कायम धावण्याचा सराव करण्यास सांगायचे. अकादमीच्या बाहरे रस्त्यावरुन धावायला सांगायचे. पाच किमी अंतर होतं. धावाताना विराट कायम मागे असायचा. पण सायकलवरुन दूध घेऊन जाणाऱ्या लोकांकडे लिफ्ट मागयचा, असं करुन तो शर्यत जिंकायचा आणि त्याला पुढे धावताना पाहून कोच राजकुमर शर्मा खूश व्हायचे.

महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीला तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. विराट कोहलीने 2013 मध्ये वनडेमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाची कमान हाती घेतली होती. तसचं, जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय कर्णधार म्हणून त्याने शेवटचा सामना (कसोटी) खेळला.

- Advertisement -

तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम असा होता

कोहलीने 2014 मध्ये पहिल्यांदा भारतीय कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. ज्यामध्ये टीम इंडियाने 40 जिंकले आहेत आणि 17 सामने गमावले आहेत. कोहलीने आपल्या कर्णधारपदाच्या काळात कसोटीत 54.80 च्या सरासरीने 5 हजार 864 धावा केल्या.

एकदिवसीय सामन्यांमध्ये, कोहलीने टीम इंडियासाठी एकूण 95 सामन्यांचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये संघाने 65 सामने जिंकले आहेत आणि 27 गमावले आहेत. या दरम्यान कोहलीने एकूण 5 हजार 449 धावा केल्या आहेत.

याशिवाय कोहलीने टी-20 इंटरनॅशनलमध्ये एकूण 50 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यामध्ये टीमने 32 सामने जिंकले आहेत आणि 16 गमावले आहेत. यादरम्यान कोहलीच्या बॅटमधून 1 हजार 570 धावा निघाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -