IPL 2021 : ऋषभ पंतने ‘या’ चुका टाळल्या तर IPL ट्रॉफी दिल्लीकडे – गावस्कर

gavaskar-on-pant
ऋषभ पंतच्या कामगिरीकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे. भारताचे लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांनी ऋषभच्या कामगिरीवर टिप्पणी केली आहे. एकप्रकारे गावस्कर यांनी ऋषभला सल्ला देऊ केला आहे. एकप्रकारे आगामी आयपीएल ट्रॉफीमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी गावस्कर यांनी मोलाचा सल्ला ऋषभला देऊ केला आहे.
सुनिल गावसकर म्हणतात की, जर रिषभ पंतने मागच्या २ सामन्यातील चुका लक्षात घेतल्या तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ २०२१ च्या आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरू शकतो. एक कर्णधार तेवढाच चांगला असतो जेवढा त्याचा संघ असतो, ह्या वाक्यात काही चुक नाही दिल्लीचा संघ खूप चांगला आहे. त्यांच्या संघाकडे आक्रमक फलंदाज आहेत, गोलंदाजीची बाब म्हणजे त्यांच्याकडे सत्रातील सर्वात आक्रमक गोलंदाजांची फौज आहे. संघाला मागील दोनही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे कारण कर्णधाराने आपली एक वेगळीच प्राथमिकता वापरली आहे. गावसकरांनी पंतला सल्ला देताना खडेबोल देखील सुनावले.
सीएसके आणि बंगळुरू विरूध्द झालेल्या पराभवाच्या सामन्यांचा दाखला देत गावसकरांनी पंतच्या चुकीच्या निर्णयांवर भाष्य केले. बंगळुरू विरूध्दच्या सामन्यात त्याने एक अपेक्षा असलेला आणि युवा गोलंदाज आवेश खानला शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी दिली, पण तो दबावाचा सामना करू शकला नाही.
चेन्नई विरूध्द पहिल्या क्वालिफायर  सामन्यामध्ये अक्षर पटेलला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाठवले. पण अक्षरने मागील काही सामन्यांत काही चांगली कामगिरी केली नव्हती, त्याचा फलंदाजीवर पुरेसा अभ्यास देखील नाही. या गोष्टीचा परिणाम म्हणजे दिल्लीच्या संघाला विनाकारण षटके आणि चेंडू गमवावे लागले. त्या चेंडूत फॉर्ममध्ये असलेला शिमरॉन हेटमायर १५ ते २० अतिरिक्त धावा बनवू शकला असता. आणि जेव्हा धांवाचा बचाव करण्याची वेळ आली तेव्हा पंतने टॉम करनला शेवटचे षटक दिले, त्याच्या व्यतिरिक्त अनुभवी गोलंदाज कगिसो रबाडाचे १ षटक राहिले होते.
हा हंगाम त्याच्या कर्णधार पदातील पहिला हंगाम आहे, अशातच त्याने घेतलेल्या निर्णयाचा निकाल चांगला येत नसेल तर त्याच्यावर टिका होईल. सीएसके विरूध्दच्या सामन्यात पंतचा मार्गदर्शक धोनीने त्याच सामन्यात शार्दुल ठाकुरला फलंदाजीसाठी पाठवून अक्षर पटेल सारखेच चित्र तयार केले होते. ठाकूरनेही अर्ध्या सत्रात मुश्किलचा सामना करत चेंडू खेळले होते. नंतर धोनीने दाखवून दिले नेतृत्व काय असतं ते तो बरोबर वेळ साधून फलंदाजीसाठी आला आणि दिमाखात सीएसकेला अंतिम फेरीत पोहचवले. पंतची एक गोष्ट चांगली आहे तो प्रत्येक स्थितीत सकारात्मक असतो, तो मागील सामन्यात काय झाले याकडे लक्ष न देता केकेआर विरूध्दच्या सामन्यात तो त्याच्या शैलीनुसार खेळेल.