घरक्रीडाENG VS INDIA TEST MATCH: टीम इंडिया रचणार इतिहास

ENG VS INDIA TEST MATCH: टीम इंडिया रचणार इतिहास

Subscribe

भारतीय संघाला ५० वर्षांपासून लंडनच्या ओवलमध्ये विजयाला गवसनी घालता आली नाही

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा चौथा सामना आज लंडनच्या ओवल मैदानात खेळवला जात आहे. दोन्ही संघ पाच कसोटी मालिकांच्या सामन्यात १-१ अशा बरोबरीत असताना ट्रेंट ब्रीजवर खेळला गेलेला पहिला सामना अनिर्नित ठरला होता. तर लॉर्डसवरचा दुसरा कसोटी सामना भारताने आपल्या नावे केला त्यानंतर लीडस मैदानावर झालेला तीसरा सामना इंग्लंडने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला आघाडी घ्यायची असेल, तर जो पराक्रम ५० वर्षात नाही करता आला असा पराक्रम करावा लागेल. भारतीय संघाने एकही कसोटी सामना ५० वर्षात या ओवल मैदानावर जिंकला नाही आहे. भारत (१९३६-२०१८) सालापासून १३ कसोटी सामने ओवल मैदानावर खेळला असून त्यात पाच सामन्यात पराभव तर सात सामने अनिर्नित ठरले आणि एका सामन्यात विजय मिळाला आहे.

- Advertisement -

भारतीय संघाला १९७१ साली एकमात्र विजय या ओवल मैदानावर मिळवता आला. त्यानंतर आजपर्यंत ५० वर्षात एकही कसोटी सामना भारताला जिंकता आला नाही. १९७१ च्या कसोटी सामन्यात भारतीय संघ खेळत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये बी एस चंद्रशेखर यांनी ३८ धावा देत सहा गडी बाद केले भारताने हा सामना चार गडी राखून जिंकला. या मैदानावर भारतीय संघाने शेवटचा सामना २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यावर खेळला त्यात भारताला इंग्लंडकडून ११८ धावांनी पराभव पत्करावा लागला.

आजच्या चौथ्या कसोटी सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांच लक्ष लागलं आहे. त्यातच भारतीय संघाची कामगिरी पहावी लागेल.

- Advertisement -

चौथ्या कसोटी साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, ऋद्धिमान साहा, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर आणि प्रसिद्ध कृष्णा.


हेही वाचा – ENG VS IND 4TH TEST: उमेश यादव, शार्दुल ठाकुरचा भारतीय संघात समावेश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -