घरक्रीडाLata Mangeshkar : टीम इंडियाने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात काळी...

Lata Mangeshkar : टीम इंडियाने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली, वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात काळी फीत बांधून मैदानात

Subscribe

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनांनंतर संपूर्ण जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहेत. टीम इंडियाने लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. यावेळी टीम इंडियाने सामन्यात काळी फीत बांधून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही याबाबत माहिती दिली आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या दोन्ही संघातील सामना सुरू आहे.

किरण पोलार्डच्या नेतृत्त्वात वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यामध्ये तीन वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यात येणार आहे. पहिल्या वनडे मालिकेला सुरूवात झाली असून टीम इंडियाने टॉस जिंकला. तसेच पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजला पहिला झटका दिला आहे.

- Advertisement -

टीम इंडिया १००० वा वनडे सामना खेळणार असून भारत जगातील पहिला देश ठरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली हा सामना खेळला जात असून इशान किशन, मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या दोन नवीन क्रिकेटपटूंना खेळण्यास संधी देण्यात आली आहे.

विराट कोहलीने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

- Advertisement -

विरेंन्द्र सेहवागने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

अनिल कुंबळे यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

संजय मांजरेकर यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली


हेही वाचा : Lata Mangeshkar : शतकानुशतकं लतादीदींचा तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -