घरक्रीडाIPL 2022 : मुंबई इंडियन्ससाठी हा खेळाडू ठरू शकतो धोकादायक, रोहित शर्माला...

IPL 2022 : मुंबई इंडियन्ससाठी हा खेळाडू ठरू शकतो धोकादायक, रोहित शर्माला सतर्कतेचा इशारा

Subscribe

हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. पण आयपीएल २०२२ मध्ये मुंबईचा संघ सलग तीन सामने हरला आहे. आज मुंबई इंडियन्सचा सामना आरसीबी संघाशी होणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्माला खेळाडूपासून सावध राहण्याची गरज आहे.

हा खेळाडू करू शकतो जेतेपदाचे स्वप्न भंग

आयपीएल २०२२मध्ये दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली आहे. त्याने आपल्या फलंदाजीतून सर्वांना चकित केले आहे. दिनेश कार्तिक ३६ वर्षांचा झाला असून तो या वयातही RCB संघाला सामने जिंकून देण्याचा प्रयत्न करत आहे.
दिनेश कार्तिकने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४४ धावांची खेळी केली. आरसीबीला दिनेश कार्तिक हा खेळाडू एक जबरदस्त फिनिशर मिळाला आहे. कार्तिक शेवटच्या षटकांमध्ये जोरदार फलंदाजी करतो. दिनेश कार्तिकच्या आयपीएलची कारकीर्द संपणार असे सगळे समजत असताना कार्तिकने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवून दिले आहे.

- Advertisement -

तिलक वर्माची उत्कृष्ट कामगिरी

तिलक वर्माही मुंबई इंडियन्ससाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. तर, ब्रेव्हिसने पदार्पण करत शानदार खेळी केली. सूर्यकुमार यादवनेही कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट खेळी केली. टायमल मिल्सने सर्व सामन्यांमध्ये सातत्याने विकेट्स घेतल्या आहेत, तर बासिल थम्पी आणि मुरुगन अश्विन देखील चांगल्या फॉर्मात आहे.

रोहित शर्मा करू शकतो विक्रम

कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमध्ये ५०० चौकार पूर्ण करण्यासाठी पाच चौकारांची गरज आहे. चौकारांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर तो पाचवा फलंदाज ठरणार आहे. यावेळी त्याला २०० षटकार पूर्ण करण्यासाठी आणखी पाच षटकारांची गरज आहे. जसप्रीत बुमराह, २४ विकेट्ससह आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पवारसाहेबांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग, सुरक्षेत वाढ करा – महेश तपासे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -