घरक्रीडाWTC Final : ओडिशा अपघातातील मृतांना टीम इंडियाकडून श्रद्धांजली, काळीपट्टी बांधून केला...

WTC Final : ओडिशा अपघातातील मृतांना टीम इंडियाकडून श्रद्धांजली, काळीपट्टी बांधून केला शोक व्यक्त

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final)चा अंतिम सामना पार पडत आहे. हा सामना लंडनच्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर होत आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सामना सुरू होण्यापूर्वी ओडिशा अपघातातील मृतांना टीम इंडियाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच काळीपट्टी बांधून शोक देखील व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे एक मिनिट उभं राहून मौन राखत खेळाडूंनी आणि क्रिकेटप्रेमींनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

या सामन्यातील आजचा पहिला दिवस आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी हातावर काळीपट्टी बांधलेली आहे. फक्त भारतीय संघानेच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या संघातील सर्वच खेळाडूंनीही काळीपट्टी बांधलेली आहे.

- Advertisement -

ओडिशातील घटनेने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेबद्दल संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशावेळी भारतीय आणि ऑस्ट्रेलियाच्या संघासह ओव्हल मैदानावर, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि संपूर्ण जगाला एकतेचा अन् मानवतेचा संदेश दिला. याबाबत बीसीसीआयनेही ट्विट करत माहिती दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : WTC Final 2023 : अंतिम सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने; कोणाचं पारडं जड?

डिशातील बालासोर रेल्वे अपघातात (Odisha Train Accident) आतापर्यंत 250हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्हाला खूप अडचणी येत आहेत. काही मृतदेहांवर अनेक जण दावा करत आहेत, असे हावडा अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी जितिन यादव (Howrah ADM Jitin Yadav) यांनी सांगितले. तथापि, यातून मार्ग काढण्यासाठी भुवनेश्वर एम्स (Bhubaneswar AIIMS) पुढे आले असून एम्सने डीएनए (DNA) सॅम्पलिंग सुरू केले आहे. मृतदेहावर दावा करणाऱ्या कुटुंबाकडून 10 डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.

मृतांपैकी बहुतांश या राज्यांतील 

पश्चिम बंगाल आणि ओडिशा प्रशासनाने संयुक्तपणे एम्स भुवनेश्वर येथे हेल्पडेस्क सुरू केला आहे. बहुतेक बळी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांतील आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीबीआय, रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि जीआरपी यांनी रेल्वे अपघाताची चौकशी सुरू केली आहे.


हेही वाचा : Odisha Train Accident : 101 मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, काही मृतदेहांवर अनेकांचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -