IND vs SA : पुजारा आणि रहाणेच्या टेस्ट करिअरबाबत विराट कोहलीने सांगितलं असं काही…

चतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची उत्तम कामगिरी

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडियाचा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या करिअरबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोहलीने सामना संपन्न झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भविष्यात काय होईल याबाबत मी काहीही सांगू शकत नाही, असं विराट कोहली म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी उत्तम कामगिरी केली. पुजाराने ६ डावात २०.६७ च्या सरासरीने १२४ धावा केल्या. दुसरीकडे रहाणेने सहा डावांत २२.६७ च्या सरासरीने १३६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत १-२ अशा पराभवानंतर दोघांनाही संघातून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पुजारा आणि रहाणेच्या भविष्याबाबत विचारले असता कोहली म्हणाला की,
भविष्यात काय होणार आहे याबद्दल मी येथे बोलू शकत नाही. मी इथे चर्चा करायला बसलो नाहीये. यावर तुम्ही निवडकर्त्यांशी बोलायला हवे. ते माझं काम नाहीये.

तो पुढे म्हणाला की, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या खेळाडूंनी गेल्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. जोहान्सबर्गमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे. निवड समिती काय निर्णय घेईल. याबाबत मी काहीही सांगू शकत नाही, असं कोहली म्हणाला.


हेही वाचा : IND vs SA: विराट कोहलीच्या चुकीमुळे टीम इंडियाचा पराभव, आफ्रिकन कर्णधाराचा मोठा खुलासा