RCB vs GT: आयपीएलमध्ये ५७ धावांचा टप्पा आणि कोहलीचा विक्रम

आयपीएलच्या १५ व्या हंगामातील ६७ वा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. ऑलराऊंडर आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. परंतु दुसरीकडे आरसीबीचा संघ फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळवला जात आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल तर आरसीबीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.

आजच्या सामन्यात विराट कोहलीने ५७ धावा केल्यानंतर मोठा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. ५७ धावा करताच विराट कोहली नव्या विक्रमाला गवसणी घालणार आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ५७ धावा केल्यानंतर तो इतिहास रचू शकतो. विराट कोहलीने आरबीसी संघासाठी ६ हजार ९४३ धावा केल्या आहेत. मात्र, ५७ धावा करताच उत्कृष्ट कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरू शकतो.

आयपीएलचा १५ वा हंगाम विराट कोहलीसाठी खास राहिला नाही. यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीन तीन वेळा गोल्डन डकचा शिकार सुद्धा झालाय. विराटच्या खराब कामगिरीमुळे त्याला भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी सुद्धा मोलाचा सल्ला दिला आहे.

यंदाच्या हंगामात विराट कोहलीला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. १३ व्या सामन्यात कोहलीला फक्त २३६ धावा काढता आल्या आहेत. तर यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीची सर्वात्कृष्ट धावसंख्या ५८ इतकीच आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली: ६५१९ धावा
शिखर धवन: ६२०५ धावा
रोहित शर्मा: ५८७७ धावा
डेविड वॉर्नर: ५८७६ धावा
सुरेश रैना: ५५२८ धावा


हेही वाचा : Vijay Yadav : भारतीय माजी खेळाडूच्या मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले, बीसीसीआय मदत करण्याची शक्यता