घरक्रीडापेंग शुईच्या चिंतेमुळे WTA चा मोठा निर्णय; हाँगकाँगसह चीनमधील सर्व स्पर्धा केल्या...

पेंग शुईच्या चिंतेमुळे WTA चा मोठा निर्णय; हाँगकाँगसह चीनमधील सर्व स्पर्धा केल्या स्थगित

Subscribe

महिला टेनिस असोसिएशनतर्फे पेंग शुईच्या सुरक्षेच्या चिंतेच्या कारणास्तव हाँगकाँगसह चीनमधील सर्व स्पर्धा केल्या स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली आहे

महिला टेनिस असोसिएशनतर्फे पेंग शुईच्या सुरक्षेच्या चिंतेच्या कारणास्तव हाँगकाँगसह चीनमधील सर्व स्पर्धा केल्या स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली आहे. महिला टेनिस असोसिएशनच्या (WTA) ट्विटर पेजच्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. असोसिएशनतर्फे सांगण्यात आले की, दुहेरीतील काही काळ जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर राहिलेल्या पेंग शुईच्या सुरक्षेच्या कारणास्ताव स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह सायमन यांनी एका निवेदनात म्हंटले की, “पेंग शुईला मोकळ्या मनाने तिच्या इच्छेनुसार संवाद साधण्याची परवानगी नसताना मी तिथे स्पर्धा कशी करू शकते”. लक्षणीय बाब म्हणजे पेंग शुईवरील लैगिंक छळाचे आरोप खोटे असून तिच्यावर दबाव टाकल्याचे सायमन यांच्या निवेदनात नमूद आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सायमन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मला शुईच्या आरोपात काही तथ्य वाटत नसल्याचे म्हंटले होते. त्यानंतर पेंग शुईने देखील विश्रांतीसाठी सर्वांपासून काही काळ दूर जात असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता स्पर्धांना स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यापूर्वी पेंग शुईने कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे डब्ल्यूटीए अध्यक्षांनी शुईच्या सुरक्षेबाबत शंका व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, महिला टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह सायमन यांनी सांगितले की, “स्पर्धा स्थगित करण्याच्या निर्णयामुळे महिला टेनिस असोसिएशनला लाखो डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. मात्र काही संचालक मंडळांचा या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे. पुरूष खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीच अव्वल असलेल्या नोवाक जोकोविच आणि महिला टूरच्या संस्थापक बिली जीन किंग यांच्यासोबत कित्येक अव्वल खेळाडूंनी याला पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

“मी या क्षणाला हाँगकाँगसह चीनमधील सर्व WTA स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा करत आहे. दरम्यान सायमन यांनी आणखी म्हंटले की, “या क्षणाला मला आणि सर्व खेळाडूंना २०२२ मध्ये चीनमध्ये आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये किती संकटांचा सामना करावा लागेल याबाबत खूप चिंता वाटते”.

महिला टेनिस असोसिएशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील स्पर्धा स्थलांतरित अथवा रद्द करण्यापूर्वी ११ कार्यक्रमांचे नियोजन केले होते. मात्र २०२२ चे वेळापत्रक अद्याप ठरले नाही.


हे ही वाचा: http://IND vs NZ 2nd Test : तब्बल ३३ वर्षानंतर मुंबईत असणार भारत-न्यूझीलंड आमनेसामने; विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -