घरटेक-वेकभारतातीयांनो ३ लाखातल्या Best Budget Cars, टचस्क्रिन इन्फोटेनमेंट अन् जबरदस्त मायलेज

भारतातीयांनो ३ लाखातल्या Best Budget Cars, टचस्क्रिन इन्फोटेनमेंट अन् जबरदस्त मायलेज

Subscribe

भारतात ३ लाखांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या काही कार आहेत ज्यात आहे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट आणि जबरदस्त मायलेज. त्यामुळे नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि ती ही आपल्या बजेटमध्ये तर जाणून घ्या ३ लाखांच्या आत भारतात कलामीचा मायलेज देणाऱ्या कार.

आयुष्यात स्वत:च्या घराखाली स्वत:ची एक कार हवी असे सर्वांचे स्वप्न असते. त्यासाठी आपण आयुष्यभर मेहनत घेत असतो. कार तर घ्यायची असते पण कधी कधी आपल्या बजेटच्या बाहेरील कार खरेदी करणे आपल्याला परवडत नाही. तर एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती पाहूनही कार नको असे वाटते. मात्र अशा परिस्थितीतही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे.  आपल्या बजेटमध्ये कार मिळत म्हणून अनेक जण निराश होतात. मात्र अशा परिस्थितीत ऑटोमेकर कंपन्यांनी लोकांच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊन आपल्या बजेटमध्यल्या कार बाजारात आणल्या आहेत. भारतात ३ लाखांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या काही कार आहेत ज्यात आहे टचस्क्रिन इन्फोटेनमेंट आणि जबरदस्त मायलेज. त्यामुळे नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि ती ही आपल्या बजेटमध्ये तर जाणून घ्या ३ लाखांच्या आत भारतात कलामीचा मायलेज देणाऱ्या कार. (3 lakh best budget cars in India, touchscreen infotainment and tremendous mileage)

Maruti Suzuki Alto

भारतातील सर्वात टॉप कार कंपनी म्हणून मारुती सुझूकी अल्टो मॉडेला पसंती दिली जाते. कमी बजेट पण कमाल गाडी म्हणून मारुती सुझूकीला ग्राहकांनी नेहमीच पसंती दिली आहे. या कारची किंमत २.९९ लाख इतकी आहे. अल्टो कार सुमारे २२.५ किलोमीटर मायलेज देते. मारुती सुझूकी कंपनीच्या एकूण कारमधील अल्टो ही कार सर्वात विकली जाणारी कार म्हणून ओळखली जाते. यात ७९६ सीसी इंजिन आहे. EBD सह ABS,ड्राइव्हर साइड एअर बॅग,सीट बेल्ट रिमाइंडर,स्पीड अलर्ट आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्सही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या कारला स्मार्टफोन केनेक्टिव्हिटीसह ७ इंचाची टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. पेट्रोल,सीएनजी असे दोन्ही पर्याय कारसाठी उपलब्ध आहेत.

- Advertisement -

Datsun Redi-Go

डॅटसन रेडी गो या गाडीचे चार प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या गाडीची सुरुवात ३.८३ लाख रुपयांपासून सुरु होते. यात ७९९ सीसी ते ९९९ सीसी पर्यंतचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ५४ PS ते 67 PS पर्यंत पावर आणि ९१ NMचे पीक टॉर्क जेनरेट करण्याची क्षमता देण्यात आली आहे. ही कार प्रति लीटर २२.७ किलोमीटर मायलेज देते. ABS with EBD, ड्रायव्हर साइड एअर बॅग,सीट बेल्ट रिमांइ़डर,मागील पार्किंग सेन्सर्स आणि स्पीड वॉर्निंग सिस्टम देण्यात आली आहे.

Renault Kwid

या कारची सुरुवातीची किंमत एक्स शोरुम ३.१८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. कमी बजेटमध्ये मिळणारी कॉम्पॅक्ट हॅचबॅक असलेली एक उत्तम कार आहे. रेनो क्विड या कारच्या लुकवरुन या कारला सर्वात जात पसंती मिळाली आहे. रेनो क्विड कारचे पाच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. कारमध्ये ७९९ ते ९९ सीसी पर्यंतचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल इंजिनच्या पर्यायासह हा ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील देण्यात आले आहे. १.० लीटर इंजिनमध्ये मॅन्युअल व्यतिरिक्त ५ स्पीट AMT गीअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – यूएईचा Golden Visa म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -