घरटेक-वेकपाहिला आहे का असा कॉम्प्युटर? जो चालतो पाण्यातही

पाहिला आहे का असा कॉम्प्युटर? जो चालतो पाण्यातही

Subscribe

पाण्यात राहूनही चालू शकणारा देशातील पहिला कॉम्प्युटर निशिकांत भावसार नावाच्या तरुणाने तयार केला आहे. असा कॉम्प्युटर आम्हालाही मिळावा यासाठी आता अनेक कॉम्प्युटरचे चाहते पुढे सरसावले आहे.

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी पाणी किती घातक हे सांगायला नको. म्हणजे आता कितीही वॉटरप्रुफ वस्तू आल्या तरी त्या घाबरुन आपण पाण्यापासून लांबच ठेवतो. पण एका तरुणाने चक्क पाण्याच्या आत चालणारा कॉम्प्युटर तयार केला आहे. देशात पहिल्यांदाच असा प्रयत्न करण्यात आला असून निशिकांत भावसार असे त्याचे नाव असून सध्या त्याच्या अभिनव प्रकल्पाची चर्चा सगळीकडे होत आहे.

कसा आहे हा नवा कॉम्प्युटर ?

मुळचा इंदौरचा रहिवासी असलेल्या निशिकांतने एका स्पर्धेसाठी हा कॉम्प्युटर तयार केला. हा कॉम्प्युटर पाण्याखाली असला तरी पाण्याचा थेंबही स्पर्श होत नाही. फिशटँकमध्ये तयार करण्यात आलेला हा कॉम्प्युटर असून पाण्याखाली असल्यामुळे तो कॉम्प्युटर थंड ठेवण्यासही मदत करणार आहे. आता महत्वाची गोष्ट अशी की, पाण्यासारखे दिसत असणारे हे लिक्विड पाणी नसून त्यात ऑक्सिजनचे प्रमाण 0% आहे. यासाठी पाण्यासारखे दिसणारे Industrial class non electro conductive coolant वापरण्यात आला असून एकूण ८२ हजारांचा खर्च आला आहे. या मशीनचे नाव त्याने ‘अॅक्वामोड’ (AQUA MOD) असे ठेवले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या नव्या प्रयोगाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे.

- Advertisement -
nishikant
निशिकांत त्याच्या अॅक्वामोड (AQUA MOD) सोबत

अशी सुचली कल्पना

निशिकांत या आधी देखील पाण्याखाली चालणाऱ्या कॉम्प्युटरबद्दल अधिक माहिती घेत होता. त्याच्या मित्राने पाण्याखाली कॉम्प्युटरची सिस्टीम थंड ठेवण्यासाठी अंडरवॉटर कुलिंग सिस्टीमबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्याने असाच एक कॉम्प्युटर बनवायचे ठरवले आणि त्याने नवा कोरा पाण्यात चालणारा कॉम्प्युटर बनवलाच आणि बंगळुरुला झालेल्या स्पर्धेत त्यांनी हा कॉम्प्युटर सादर केला.

View this post on Instagram

This is how it actually rolls ?

A post shared by Nishikant Bhavsar (@bhavsarnishikant) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -